छत्रपती शिवरायांनी आपल्यातील जाणकार मंडळी जपानमध्ये का पाठवली नाही?- बाबासाहेब पुरंदरे
प्रख्यात इतिहासकार, लेखक आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी २९ जुलै रोजी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणी सोशल मीडिायातून जागवल्या होते. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक व्यक्ती ३० वर्ष आपल्या इथे राहून सर्व व्यवस्था समजून, परदेशात गेला.
मात्र त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील काही जाणकार लोक जपान किंवा इतर देशात का पाठवले नाहीत? जर महाराजांनी तिथे आपले काही लोक पाठवले असते तर तेथील तंत्रज्ञानाची अधिक माहिती मिळाली असती, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
महाराजांनी जाणकार लोकांना परदेशात पाठवयाला पाहिजे होते असं आजही वाटतं. मात्र त्यांनी ती का पाठवली नाहीत याच मला नवल वाटतं, अशी भावनाही पुरंदरे यांनी व्यक्त केली. महाराजांनी असं केलं असतं तर पुढील पिढीला आणखी फायदा झाला असता, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी पूर्ण केल्याच्या निमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आहेत. ते कुठल्या गल्लीतले, बोळातले, जातीतले, धर्मातले नाहीत. तर ते जगाचे आहे.
त्याहीपेक्षा सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीत शिवाजी महाराजांचे चरित्र मार्गदर्शक ठरणारे असून शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय विचार दिला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ताज्या बातम्या
पिंपरीतील अन्वीला रोहित पवारांचा मदतीचा हात; उपचाराचा निधी उभारण्यासाठी लोकांना केली विनंती
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: