सुवर्णपदकविजेता नीरज चोप्रा आहे मराठा समाजाचा वंशज; पूर्वजांनी पानिपतात गाजवला पराक्रम

August 08, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली। टोकियो ऑलम्पिकचा शेवटचा दिवस भारतासाठी सुवर्ण ठरला. कारण भालाफेकीत नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक जिंकून देत अॅथलेटिक्स या खेळातील १२५ वर्षांनंतर ऑलिम्पिक्समधील दुष्काळ संपवला आहे.

अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. त्यामुळे देशाला मोठा आनंद झाला असून अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अगदी लहानग्यांपर्यंत सर्वच नीरजचे कौतुक करत आहेत. नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे.

धावत पळत चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे व्हिडिओत दिसून येते. त्यानं ८७.८८ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक आपल्या नावावर केले आणि भारताच्या खात्यात टोकियो ऑलिम्पिकमधील सातव्या पदकाची नोंद झाली.

त्यानंतर नीरजच्या या कामगिरीनंतर अनेकांनी त्याला बक्षीस जाहीर केलं आहे. मात्र भारताला निरजने मिळवून दिलेल्या यशानंतर आता सोशल मीडियावर नक्की नीरज कोण आहे. त्याने आतापर्यंत काय केले आहे या सगळ्या गोष्टी सर्च व्हायला सुरुवात झाली आहे.

याचदरम्यान एका दिलेल्या मुलाखतीत त्याची नाळ महाराष्ट्राची जोडली असल्याचा उल्लेख आहे. नीरज चोप्रा जरी हरियाणाचा असला तरी त्याची महाराष्ट्राशी देखील ऐतिहासिक नाळ जोडलेली आहे. त्याच्या पूर्वजांनी काही शतकांपूर्वी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात बालाजी बाजीरावांसाठी तलवार उचलत हरियाणात स्थलांतर केले.

नीरज चोप्रा, त्याच वंशजांपैकी एक. जाट ह्रदयभूमीत स्थायिक झालेला एक लढाऊ रोड मराठा म्हणजे चोप्रा. नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे,” मुलाखतीत म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पानिपतच्या युद्धासाठी गेलेल्या मराठा सैन्यात पायदळ आणि घोडदळ या दोघांचाही समावेश होता. त्याकाळी मराठा सैन्याच्या अनेक हत्यारांपैकी दोन हत्यारे महत्त्वाची असत. एक म्हणजे तलवार आणि दुसरे म्हणजे भाला. अर्थात भाला हा त्याकाळात सर्वच सैनिकांकडून वापरला जायचा.

अशातच नीरज चोप्राला देखील भालाफेकितच सुवर्णपदक मिळाले आहे. नीरजने आपला वारसा सार्थ ठरवत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची जिद्द दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची झलकच त्याच्या चपळाईत आणि भालाफेकीत दिसून येते. त्यामुळेच, मी रोड मराठा असल्याचा मला अभिमान आहे, असे नीरजने २०१६ साली एका मुलाखती म्हटले होते.

यापूर्वी नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. व आता त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
महत्वाच्या बातम्या
सुवर्णदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रावर पैशांचा पाऊस; चैन्नई सुपर किंग्सकडून १ कोटीचं बक्षीस
अरे वा! सुवर्णपदक जिंकल्यानंतर हरयाणा सरकारची नीरज चोप्राला सहा कोटींची भेट, तर बीसीसीआय देणार १ कोटी 
पत्नीच्या आरोपानंतर हनी सिंगने पहिल्यांदा सोडले मौन; म्हणाला सर्व आरोप खोटे आहेत…
LIC चा खास प्लॅन! आता 150 रुपयात मिळेल 19 लाखांचा फायदा; कसे काय जाणून घ्या एका क्लिकवर


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: