राज्यातील परिस्थिती सध्या काँग्रेसला अनुकूल!; पटोलेंनी दिले मोठे संकेत

August 27, 2021 0 Comments

मुंबई: 'काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून सर्वात जुना आणि मोठा पक्ष आहे. राज्यातील परिस्थिती सध्या पक्षाला अनुकूल आहे. काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे', असे सूचक विधान करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी पुन्हा एकदा राज्यात काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष बनवण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ( ) वाचा: विधानसभा, लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक आज येथे झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे जवळपास १४ ते १५ उमेदवार अत्यंत कमी मताने पराभूत झाले आहेत. आता आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आपला प्रयत्न असेल. राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी बूथ कमिट्या सक्षम करण्यावर भर द्या. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. वाचा: देशातील जनता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाच्या कारभाराला कंटाळली आहे. शेतकरी आंदोलन करत असून त्यांच्याकडे सरकार लक्ष देत नाही, महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असून जनतेला भेडसावणाऱ्या या समस्यांकडे केंद्रातील सरकार दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील सरकार करोनाची परिस्थिती हाताळण्यातही सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर द्या आणि समर्पण भावनेने काम केल्यास काँग्रेसची कामगिरी उज्ज्वल होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष , प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आमदार कुणाल पाटील, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, संजय निरूपम, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, चारूलता टोकस, मधु चव्हाण, रमेश बागवे, वसंत पुरके, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व डॉ. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: