भारतातील ‘या’ मिनारवर भाऊबहिणींना जाण्यास आहे बंदी; मिनारवर जाताच ते बनतात नवरा-बायको

August 30, 2021 , 0 Comments

भारताची संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. भारत प्राचीन काळापासून ऋषिमुनींचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच देशात अनेक धार्मिक वास्तु आहे. तसेच त्या वास्तुसंबंधीत अनेक मान्यताही असतात.

उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये लंका नावाचे एक मीनार आहे. याच्या संबंधीही अनेक मान्यता जुळलेल्या आहे. असे म्हटले जाते की, या मीनारवर भाऊबहिणीने एकत्र जाऊ नये. तसेच जर सख्खे भाऊ बहिण या मीनारवरती गेले तर ते पती पत्नी बनूनच खाली येतात.

हे लंका मीनार जालौनच्या कालपीमध्ये आहे. हे मीनार २१० फूट उंच असून हे १८५७ मध्ये मथुरा प्रसाद निगम यांनी बांधले होते. लंका मीनारबद्दल असे म्हटले जाते की, हे मीनार तयार करण्यासाठी २० वर्षांपेक्षा जास्त वेळ लागला होता. या मीनारवर भाऊबहिणींना येथे एकत्र जाण्यास मनाई आहे आणि याचे कारण या मीनारची रचना.

या मीनारच्या सर्वात वरती पोहचण्यासाठी व्यक्तीला ७ फेऱ्या मारुन वर जावे लागते. या ७ फेऱ्यांचा संबंध पती पत्नीच्या ७ फेऱ्यांशी जोडला जातो. असे म्हटले जाते की जर सख्खे भाऊबहिण एकत्र या मीनारवर गेले, तर त्यांना ७ फेऱ्या माराव्या लागतील आणि यामुळे ते पती पत्नीसारखे होतील.

त्यामुळेच या मीनारवर भाऊबहिणींना एकत्रवर जाण्यावर बंदी आहे. जालौनमध्ये राहणारे लोक आजही ही परंपरा पाळतात आणि इतरांनाही ते पाळायला सांगतात. या परंपरेमुळे हे मीनार फक्त देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.

त्या काळात मथुरा प्रसाद हे रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारायचे. वर्षानुवर्षे हे काम केल्यामुळे त्यांना रावण नावानेच ओळखले जायचे. यामुळेच त्यांनी लंका मीनार बांधले होते. १८५७ मध्ये बांधलेल्या या मीनारच्या बांधकामासाठी १ लाख ७५ हजार रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला.

या मीनारमध्ये एक शिवमंदिर देखील आहे, जे रावण प्रत्येक क्षणी भोलेनाथला पाहू शकेल अशा पद्धतीने बांधण्यात आले होते. येथे १०० फूट कुंभकर्ण आणि ६५ फूट उंच मेघनाथांच्या मूर्ती आहे.

महत्वाच्या बातम्या-

कायद्यासमोर सगळे समानच, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही; न्यायालयाने हनी सिंगला सुनावले खडेबोल
मोदी सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत फक्त ३४२ रुपयांत मिळणार ४ लाखांचा विमा; जाणून घ्या काय आहे योजना
राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता, साहेब मला म्हणाले…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: