पुढील ३ वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते पाहायला मिळतील, नितीन गडकरी यांनी सांगितला मेगा प्लॅन..
नवी दिल्ली । केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामासाठी सर्वांना परिचित आहेत. ते अनेक मोठे प्रकल्प राबवून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांनी सध्या देशात राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण वेगाने केले जात आहे, असे सांगत संपूर्ण देश पुढील तीन वर्षात अमेरिकन दर्जाचे रस्ते आणि महामार्ग आपल्या देशात होतील, असे सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, आपल्या देशात दररोज ३८ किमी रस्ता तयार केला जात आहे. या अगोदर असे होत नव्हते. एका दिवसात फक्त दोन किमी रस्ता तयार केला जात होता. यामुळे आता मोठी विकासकामे उरकणार आहेत. अनेक कामे सुरू आहेत.
महामार्ग मंत्रालयाने गुजरातमध्ये अनेक प्रकल्प ताब्यात घेतले आहेत. यामध्ये भारतमाला प्रकल्पांतर्गत २५,३७० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह बांधण्यात येणाऱ्या १,०८० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश आहे. यामुळे अनेक रस्ते तयार होणार आहेत. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे आहे जो गुजरातच्या सात जिल्ह्यांतून जाणार आहे.
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर काम जोरात सुरू आहे. वडोदरा ते दक्षिण गुजरातमधील ८,७११ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह १२५ किमी रस्त्याचे बांधकाम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. असेही गडकरी म्हणाले. यामुळे भविष्यात या रोडचा वाहतुकीसाठी दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह गडकरींनी बनसाकांठाच्या डीसा शहरात ३.७५ किलोमीटर लांबीचा चार लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉरचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यामुळे येणाऱ्या काळात आपले रोड हे अमेरिकेसारखे असणार आहेत.
देशातील रस्तेनिर्मितीच्या कामासाठी १५ लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचे देखील गडकरी यांनी सांगितले. सध्या देशात अनेक ठिकाणी रोडची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही कामे पूर्ण देखील झाली आहेत.
ताज्या बातम्या
‘या’ तरुणाने वेश्यालयातील मुलीशी केले लग्न, कारण वाचून हैराण व्हाल, वाचा…
खतरनाक! तुम्हाला लोकलनं प्रवास करायचाय तर ‘हा’ टी शर्ट घाला, फोटो व्हायरल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: