'नारायण राणे हे अ‍ॅबनॉरमल; कोर्टाने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं होतं'

August 25, 2021 0 Comments

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटकेत असलेल्या केंद्रीय मंत्री ( News) यांना अखेर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतरही शिवसेनेची आक्रमक भूमिका कायम आहे. नेते आणि आमदार (Shivsena ) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत राणेंवर निशाणा साधला आहे. 'नारायणराव राणे हे अ‍ॅबनॉरमल आहेत. त्यामुळे कोर्टाने त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं होतं,' असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे. राणेंवर टीका करताना भास्कर जाधव पुढे म्हणाले की, 'मी कुणावरही कशीही टीका केली तरी माझं काही बिघडू शकत नाही, असा नारायण राणेंचा समज होता. मात्र आज नियतीने त्यांना चांगलाच धडा मिळाला आहे. नारायण राणेंची जन आशीर्वाद नसून शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या देण्यासाठीची यात्रा होती. आजच्या घटनेनंतर तरी नारायण राणे यांनी बोलताना भान ठेवावं,' असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना यापुढे काय भूमिका घेणार? नारायण राणे यांना जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना विरोध करणार का, असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, 'मुळात शिवसेनेनं नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेला कुठेही विरोध केला नव्हता. त्यामुळे आता यापुढे हा वाद वाढवायचा की संपवायचा याचा निर्णय भाजपने घ्यावा,' असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: