काळजी घ्या! मुंबईत करोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली; जाणून घ्या ताजी स्थिती

August 27, 2021 0 Comments

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात दैनंदिन रुग्णसंख्या अधिकाधिक वाढत असल्याने मुंबईकरांसाठी चिंता वाढली आहे. आजही कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ३९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २४३ इतकी होती. तर, दिवसभरात ५०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र आज अधिक आहे. काल ही संख्या २७२ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ४ इतकी होती. मात्र, मुंबईतील करोना वाढीचा दर ०.०४ टक्क्यांवरच स्थिर आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत तो तब्बल १,८२५ दिवसांवर पोहोचला आहे. (maharashtra registered 343 new cases in a day with patients recovered 272 and 4 deaths today) याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २१ हजार २५७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्क्यांवरच स्थिर आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ८२५ दिवसांवर जाऊन पोहचला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईत आज ४१ हजार ६२८ चाचण्या मुंबईत आज एकूण ४१ हजार ६२८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २४ इमारती सील करण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती २४ तासात बाधित रुग्ण - ३९७ २४ तासात बरे झालेले रुग्ण - ५०७ बरे झालेले एकूण रुग्ण - ७२१२५७ बरे झालेल्या रुग्णांचा दर -९७% एकूण सक्रिय रुग्ण- २७३६ दुप्पटीचा दर- १,८२५ दिवस कोविड वाढीचा दर (१९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट)-०.०४% क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: