महाबळेश्वर रस्त्यावर दिसले वाघ, आनंद महिंद्रांनी केला थरारक व्हिडीओ शेअर, पाहा व्हिडिओ…
महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेक गोष्टी ते सतत शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेली एखादी गोष्ट याची मोठी चर्चा देखील होते. ते अनेकांना मदत करतात, यामुळे देखील ते चर्चेत असतात. आता त्यांनी असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत महाबळेश्वरजवळच्या पंचगणीमध्ये रस्त्यावर दोन वाघ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ एक मजेशीर कॅप्शन देत शेअर केला आहे. व्याघ्र प्रकल्पामध्ये टायगर सफारीसाठी जावे असा हा व्हिडीओ वाटत आहे. गाडीच्या हेडलाइटच्या प्रकाशात दोन्ही वाघ स्पष्टपणे दिसत आहेत.
तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे… अशा कॅप्शनसहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केला. यामुळे सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. १९ ऑगस्टचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पंचगणीजवळच्या मार्गावर रात्रीच्या वेळी हे वाघ दिसले.
So our XUV isn’t the only big cat on the highway… Magnificent. pic.twitter.com/9A2ayRPXjL
— anand mahindra (@anandmahindra) August 22, 2021
हे वाघ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून बाहेर रस्त्यावर येतात. दोन वाघ पाहताच ज्या गाडीतून हा व्हिडीओ काढण्यात आलाय त्या गाडीतील प्रवासी घाबरतात आणि गाडी मागे घ्या, असे चालकाला सांगू लागतात. थोड्या वेळाने वाघ निघून जातात. यामुळे सर्वजण घाबरतात.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आणि वेगवेगळ्या वनस्पती याठिकाणी आढळून येतात. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटक देखील गर्दी करत असतात. येथे जवळच चांदोली अभयारण्य आहे.
ताज्या बातम्या
धक्कादायक! मंत्रालयाबाहेर कीटनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या, मुख्यमंत्र्यांना लिहिले होते पत्र
संजय राठोड यांच्यावरील सर्व आरोप निघाले खोटे, भडकलेल्या चित्रा वाघ व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या..
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: