‘विनाशापासून भारत टिकू शकतो पण त्याला एखाद्या मोठ्या नेत्याची गरज’ नोम चोमस्की यांचा दावा

August 22, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली। नोम चोमस्की हे आजच्या शतकातील मोठे भाषाशास्त्रज्ञ आणि राजकीय तत्वज्ञ मानला जातात. त्यांचे विज्ञान ते वैद्यकिय क्षेत्रात संशोधन उपयुक्त ठरले आहे. यापूर्वी ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक होते, तेथून निवृत्त झाल्यानंतर ते आजकाल जगभरात व्याख्याने देतात.

त्यांचा असा विश्वास आहे की भारताकडे इतकी ताकद व बळ आहे की भारत चीनला मागे टाकू शकते. त्यांनी यावेळी जगातील अनेक देशांची एकमेकांशी तुलना केली असून त्या देशाची कमजोरी व दुसरी म्हणजे शक्तिशाली बाजू मांडली आहे. ते म्हणाले की, जगातील दोन सर्वात जुन्या लोकशाही – यूके आणि अमेरिका – दोन्ही गंभीर समस्यांना तोंड देत आहेत.

ब्रिटन तुटत आहे. बोरिस जॉन्सनने लोकशाही प्रक्रियेवर गंभीर हल्ला केला आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयात येऊन रद्द करावे लागेल. स्कॉटलंड आणि वेल्समध्ये सार्वमत घेण्याची शक्यता आहे. कमी -अधिक प्रमाणात अमेरिकेतही अशीच परिस्थिती आहे. कारण जानेवारीमध्ये आम्ही अमेरिकेची सत्ता बद्दलाच्या वेळी काय परिस्थिती झाली हे पाहिले आहे.

अमेरिकेच्या कॅपिटल हिलवर झालेले हल्ले व इथे येणारे संतप्त जमाव ही गंभीर बाब आहे. हे युरोपमध्येही जाते. तेथे पारंपारिक पक्ष, ज्यांनी बराच काळ सत्ता सांभाळली आहे, ते तुटत आहेत, नाहीसे होत आहेत. जर आपण याची कारणे तपासली तर त्याचे स्रोत जुने आहेत असे ते म्हणाले.

चोमस्की यांनी अनेक समस्यांवर भाष्य केलं आहे. आजची तरुण पिढी ही मानवी इतिहासातील अक्षरशः सर्वात अनोखी पिढी आहे. मानव हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर आहेत. आता आजच्या तरुण पिढीला हे ठरवायचे आहे की मानवी इतिहासाचा हा प्रयोग टिकेल की नाही? आपण अशा संकटांमधून जात आहोत, ज्याचे समाधान आपण यापुढे टाळू शकत नाही.

यापैकी सर्वात भयावह म्हणजे पृथ्वीच्या तापमानात झालेली वाढ ही सर्वात मोठी समस्या असल्याचे चोमस्की म्हणाले. तसेच त्यांनी भारत किती ताकदवान देश आहे हे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, मी अनेक वेळा भारतात आलो आहे आणि तो एक अद्भुत अनुभव होता. हा एक अद्भुत देश आहे.

अफाट संपत्ती, सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आणि अविश्वसनीय गरीबी. मी मुंबईच्या वस्त्यांसारखे काहीही पाहिले नाही. हे अत्यंत विलासी आणि अत्यंत गरीबीचे मिश्रण आहे, जे आपत्तीजनक आहे. त्यानंतर त्यांनी एक दिल्लीमधील किस्सा सांगितलं आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, ब्रिटीशांमुळे झालेल्या विनाशापासून भारत टिकू शकतो, पण त्याला लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारा, संस्कृतीमध्ये समृद्ध आणि तांत्रिकदृष्ट्या सुदृढ अशा नेत्याची गरज आहे. हे मनोरंजक आहे की 18 व्या शतकापर्यंत भारत आणि चीन जगाचे केंद्र होते. भारतामध्ये चीनपेक्षा मोठी शक्ती बनण्याची क्षमता आहे, परंतु हा संघर्षाचा मार्ग आहे.

भारताला खूप समृद्ध बौद्धिक परंपरा आहे. माझ्या स्वतःच्या क्षेत्रातही भारतातील अद्भुत लोक आहेत, जे माझे जवळचे मित्र आहेत. काही ठिकाणी गरिबी आणि श्रीमंतीमधील भेद मिटवला गेला आहे, उदाहरणार्थ, केरळ, तामिळनाडू हे संपूर्ण भारतापेक्षा वेगळे आहेत, व तिथे भेद मिटवण्याचा प्रयत्न झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
राधा ही बावरी! श्रुती मराठेवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; सोशल मीडियावर होतोय सोज्वळ लूक व्हायरल 
आजपासून २६४ वर्षांपुर्वी पहिल्यांदा चलनात आले होते एक रूपयांचे नाणे, वाचा त्याचा इतिहास 
अरे बापरे! ऑलिम्पिक जिंकण्यासाठी तालिबानी खेळाडू स्पर्धकांना गोळीही घालतील; समोर आला ‘तो’ व्हिडिओ
अफगानिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकांना कोणकोणत्या सुविधा मिळणार? वाचा संपुर्ण माहिती


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: