कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाने केलेली धरपड पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

August 02, 2021 0 Comments

: बुलडाण्याच्या मलकापूर येथील अनिल भारूका यांच्या घरी पाळलेल्या ब्रीझरला या कुत्र्याला आजार जडला आणि त्याला वाचवण्यासाठी भारूका कुटुंबाने जीवाचं रान केलं. आजारावरील उपचाराकरिता ब्रीझरला थेट मुंबईला घेऊन जात रुग्णालयात दाखल केलं आणि ज्या पद्धतीने माणसांच्या विविध तपासण्या केल्या जातात त्या पद्धतीने महागड्या स्वरूपाच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार थेट शस्त्रक्रियासुद्धा करवून घेतली. तब्बल दीड लाख रुपयांचा खर्च करून त्याचा जीव वाचवला. या मुक्या जीवासमोर हा खर्चही भारूका परिवाराला थिटा वाटतो, कारण पैशापेक्षा त्या मुक्या जीवाचा जीव भारूका परिवाराला महत्त्वाचा वाटतो. तब्बल दहा वर्षांपूर्वी पुण्यावरून रीतसर आणलेल्या लॅब्रेडोर जातीच्या कुत्र्याच्या पिल्लाला भारूका परिवाराने कुटुंबातील सदस्या सारखे वागवले. मात्र १५ मे पासून या कुत्र्याला आजार जडला. रक्ताच्या उलटीने खाणे पिणे बंद झाले. भारूका परिवार चिंतेत पडला. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचारही केले, पण त्याची तब्येत ठीक होत नव्हती. मग ब्रीझरला आजारातून मुक्त करण्याकरता मलकापूर, अकोला, नागपूर व मुंबईपर्यंत नेत थेट भरती करून घेत एक्स-रे, कार्डिओग्राम, इसीजी, इंडोस्कोपी, सिटीस्कॅन अशा विविध प्रकारच्या महागड्या तपासण्या व शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. करोनाच्या भयावह काळात मुंबईसारख्या ठिकाणी भारूका यांचा मुलगा अभिषेक व सून चेतना यांना स्वतः मुंबईत भाड्याने खोली करून मुक्कामी देखील राहावे लागले. विशेष म्हणजे सून चेतना भारूका यांना तर तब्बल तीन आठवडे ब्रीझरला भरती केलेल्या मुंबईतील परळ भागातील दि बाई साकरबाई दिनेशॉ पेटिट अॅनिमल हॉस्पिटल, येथेच मुक्कामी राहावे लागले. तरीही त्यांनी न डगमगता ब्रीझरची काळजी घेतली. ब्रीझरवरील भारूका परिवाराचे प्रेम पाहता ब्रीझरवर उपचार करणारे डॉ. जी.एस. खांडेकर व डॉ. संतोष त्रीपाठी हे सुद्धा आश्चर्यचकित झाले. बस व रेल्वे सुविधा उपलब्ध नसताना ब्रीझरसाठी स्वतःच्या खाजगी वाहनाने मुंबई गाठून उपचारार्थ लागणाऱ्या खर्चाची तयारी ठेवत आजारी ब्रीझरची काळजी घेण्यापर्यंतची भारूका परिवाराची धडपड पाहून या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही त्यांची प्रशंसा करत उपचाराला समर्थ साथ दिली. त्यामुळेच आज ब्रीझर हा भारूका परिवारात पूर्वीसारखा कुटुंबातील सदस्याप्रमाणे वावरत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: