सुवर्णदक मिळवल्यानंतर नीरज चोप्रावर पैशांचा पाऊस; चैन्नई सुपर किंग्सकडून १ कोटीचं बक्षीस

August 08, 2021 , 0 Comments

मुंबई। शनिवारी टोकियो ऑलम्पिकचा शेवटचा दिवस होता व हाच शेवटचा दिवस भारतासाठी सुवर्णदिवस बनला कारण भारताचा भालाफेक स्टार खेळाडू नीरज चोप्रा यानं सुवर्णपदक जिंकले आहे. भालाफेक स्पर्धेत नीरजने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला टोकियो ऑलिम्पिकचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

त्यामुळे नीरज चोप्राच्या यशानंतर करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नीरज चोप्रानं रचलेल्या इतिहासानंतर नीरज चोप्रावर कौतुकांचा वर्षाव होत असून अनेकांनी नीरजला बक्षीस दिल आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आईपीएल टीम चैन्नई सुपर किंग्सकडून सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला १ कोटीचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

नीरजने केलेल्या कामगिराचा चैन्नई सुपर किंग्सला अभिमान असल्याचे ते म्हणाले. चैन्नई सुपर किंग्सकडून फक्त नीरज चोप्रालाच नाही तर कांस्य पदक विजेते सिंधू आणि बजरंग पुनिया यांना देखील २५ लाख देण्याची घोषणा केली आहे.

या सर्व खेळाडूंना आईपीएल टीमकडून आईपीएलच्या फायनलमध्ये बोलवण्यात आले आहे. त्यामुळे नीरज चोप्राच्या या कामगिरीनं सर्वाना अभिमान वाटत आहे. याआधीही सुवर्णपदक जिंकल्यानंतर हरयाणा सरकारने नीरजला ६ कोटींचे बक्षिस जाहीर केले आहे.

तसेच आता बीसीसीआयनेही टोकियोतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने दुसऱ्या राऊंडमध्ये नीरज चोप्रानं८७. ५८ मीटर एवढ्याअंतरावर थ्रो फेकला आहे. पहिल्या दोन फेऱ्यांपासून नीरज चोप्रा आघाडीवर होता.

दुसऱ्या फेरीत नीरज चोप्रानं फेकलेल्या थ्रोची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारं हे भारतातील पहिलं सुवर्णपदक ठरलं आहे. याआधी नीरजने २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षा खालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. व आता सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.
महत्वाच्या बातम्या
अरे वा! सुवर्णपदक जिंकल्यानंतर हरयाणा सरकारची नीरज चोप्राला सहा कोटींची भेट, तर बीसीसीआय देणार १ कोटी
२००० वर्षांपुर्वी समुद्रात विलीन झाले होते हे शहर; संशोधकांनी शोधल्यानंतर समोर आल्या रहस्यमयी गोष्टी
एक घाव दोन तुकडे! मिलिंद नार्वेकरांच्या राजकीय बॉम्बने राजकारणात खळबळ
एक घाव दोन तुकडे! मिलिंद नार्वेकरांच्या राजकीय बॉम्बने राजकारणात खळबळ   


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: