तहसीलदार ज्योती देवरे प्रथमच कॅमेऱ्यासमोर; आता केला 'हा' गंभीर आरोप
अहमदनगर: लोकप्रतिनिधींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पारनेरच्या तहसीलदार आज येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. तहसीलदार संघटनेच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. संघटनेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी मागण्या सादर केल्या. यावेळी व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत त्यांनी प्रथमच पत्रकरांशी संवाद साधला. 'मी आता सावरले आहे पण मला होणारा त्रास थांबलेला नाही', असे नमूद करत त्यांनी यावेळी परत एकदा गंभीर आरोप केले. ( ) वाचा: पारनेरच्या तहसीलदार आज कॅमेऱ्यासमोर आल्या व त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. व्हायरल क्लिपबाबतचं सत्य सांगतानाच यांच्या भेटीनंतर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. देवरे म्हणाल्या, 'जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे ती माझीच आहे पण ती मी व्हायरल केलेली नाही. माझ्या भावाने एका पत्रकार मित्राला दिली आणि मग व्हायरल झाली. क्लिप व्हायरल झाल्यावर अनेकांनी मला धीर दिला आणि मी त्यातून आता सावरले आहे.' वाचा: 'वेळ आल्यावर आपलीही विचारशक्ती संपते, याचा मी अनुभव घेतला. माझ्या विरुद्ध पाठविलेल्या अहवालात अनेक तांत्रिक चुका आहेत. या चौकशी अहवालाला घाबरून मी हे काहीच केलेले नाही पण माझ्यावर जो दबाव आणला जात होतो, जी भीती दाखविली जात होती त्यातून मी नकारात्नक विचार केला. आता त्यातून मी बाहेर पडले पण त्रास थांबलेला नाही. विरोधकांना अद्यापही पाझर फुटलेला दिसत नाही', असे सांगताना मी कोणाची नावं घेतली नाही, घेणारही नाही. त्यांनी स्वत:च समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे, असे सूचक विधानही काँग्रेसचे आमदार यांचे नाव न घेता ज्योती देवरे यांनी केले. वाचा: 'माझा पाठमोरा फोटो छापून अण्णा हजारे यांनी मला हाकलून दिल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. माझे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले', असे नमूद करत देवरे यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. महिला अधिकारी म्हणून जी अवहेलना होते, ती दाखवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माझे समुपदेशन केले. त्यामुळे वाईट विचारातून मी बाहेर पडले. आता लढण्यासाठी आणि कर्तव्य बजावण्यासाठी पुन्हा मानसिकदृष्ट्या तयार झाले आहे. राज्यभरातील अधिकाऱ्यांनी आज पाठिंबा दिला आहे, राज्यभर आंदोलन होत आहे. आता माझ्या कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात येत आहेत. चौकशी समिती स्थानिक अधिकाऱ्यांची नको, त्यांच्यावर दबाव येत आहे. राज्यस्तरावरील समिती हवी, अशी आमच्या संघटनेची मागणी आहे, असेही देवरे म्हणाल्या. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: