मोदी सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत फक्त ३४२ रुपयांत मिळणार ४ लाखांचा विमा; जाणून घ्या काय आहे योजना

August 30, 2021 , 0 Comments

केंद्र सरकारच्या अनेक योजना आहे, ज्यांचा लाभ सामान्य नागरीक घेत आहे. त्यातलीच एक योजना म्हणजे जन-धन योजना. आता मोदी सरकार जन-धन योजनेतील खातेदारांना मोठं गिफ्ट देण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मोदी सरकार जन-धन खातेदारांना जीवन विमा आणि अपघात संरक्षण देण्याचा विचार करत आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा आणि पंतप्रधान सुरक्षा विमा अंतर्गत संरक्षण देण्याचा विचार सध्या मोदी सरकार करत आहे.

या संदर्भात बँकांना आधीच सुचित करण्यात आले आहे. जन-धन खातेधारकांची संख्या ४३ कोटींहून अधिक झाली आहे, त्यामुळे या निर्णयाचा लाभ ४३ कोटी जन-धन खातेधारकांना मिळणे अपेक्षित आहे.

पंतप्रधान जीवन ज्योती अंतर्गत २ लाख रुपयांचा जीवन विमा दैनंदिन १ रुपयांपेक्षाही कमी प्रिमियमवर उपलब्ध आहे. यासाठी विमाधारकाला ३३० रुपयांचा वार्षिक प्रिमियम भरावा लागतो. तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत आकस्मिक अपघाताचा समावेश आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अपघाती मृत्यु आणि संपुर्ण अपंगत्वासाठी २ लाख रुपयांपर्यंत संरक्षण प्रदान करते. तसे आंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपये मिळतात. यासाठी वार्षिक १२ रुपये प्रिमियम भरावा लागतो. त्यामुळे आता जन-धन खातेधारकांना ३४२ रुपयांत ४ लाखांचा विमा मिळणार आहे.

जन-धन योजनेचा लाभ घेणाऱ्या खातेधारकांची संख्या ४३ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तर या खात्यांमधील रक्कम १.४६ लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जन-धन योजनेची घोषणा १५ ऑगस्ट २०१४ रोजी केली होती, या योजनेची सुरुवात २८ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

शेवंता साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरचा साताऱ्यात आगळावेगळा बिझनेस; ग्राहकांचा तुफान प्रतिसाद
राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा, बाळासाहेबांच्या जीवाला धोका होता, साहेब मला म्हणाले…
भारतातील या ठिकाणी भाऊबहिणींना जाण्यास आहे बंदी; कारण ऐकून धक्का बसेल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: