इतिहास घडला! तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय पुरूष हाॅकी संघाला ऑलिम्पीक पदक

August 05, 2021 , 0 Comments

टोकियो । टोकियो ऑलिम्पीकमध्ये आज एक मोठा इतिहास घडला आहे. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने जर्मनीवर ५-४ असा दणदणीत विजय मिळवला आहे.

यामध्ये भारतीय संघाने तगड्या ब्रिटन संघाला ३-१ ने हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय पुरूष हाॅकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय पुरूष हाॅकी संघाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले होते. मात्र आजच्या सामन्यात भारताने जोरदार कामगिरी केली आहे.

आज सुरूवातीपासून दोन्ही संघाने आक्रमक खेळी केली. सामन्यात पहिला गोल जर्मनीने केला आणि जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच सिमरनजीतने गोल करत भारताला बरोबरीवर आणले. त्यानंतर जर्मनीच्या नेकलास वेलेनने गोल केला. पुन्हा जर्मनीने आणखी एख गोल केला.

त्यानंतर भारताच्या चिंता वाढल्या. पेनल्टी काॅर्नरचा फायदा घेत हार्दिक सिंगने आणखी एक गोल केला. पुन्हा हरमनप्रितने भारतासाठी आणखी एक गोल केला आणि सामना ३-३ अशा बरोबरीवर नेला. यामुळे विजयाची आशा निर्माण झाली.

पुन्हा रूपेंद्रपालने आणखी एक गोल केला. तर सिमरणजीतने आणखी एक शानदार गोल करत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणापर्यंत झालेल्या सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला आहे. ४१ वर्षीनंतर भारताला हाॅकीमध्ये पदक मिळाले आहे. यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

ताज्या बातम्या

शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मालवली

अनवाणी पायाने शाळेत जाताना ज्या कारचे स्वप्न पाहिले, आज त्याच कंपनीत आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर; वाचा मनाला भिडणारी कहाणी

डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, १० हजार जणांची होणार भरती, मिळणार आकर्षक पगार..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: