धक्कादायक! MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

July 04, 2021 , 0 Comments

पुणे। आई वडील मुलांना अफाट कष्ट घेऊन शिकवत असतात. घरात आर्थिक चणचण असूनही मुलं परिस्थिती लक्षात घेऊन फार मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात.

मात्र एवढे कष्ट करूनही मुलांच्या हाती नैराश्य येत त्यावेळी ते पूर्णपणे खचून जातात. अशाच परिस्थितीतून पुण्यात राहणार स्वप्नील लोणकर जात होता.

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही.

या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. व या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलं आहे. स्वप्नीलने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल सुनील लोणकर रा. फुरसुंगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. स्वप्निलचे आईवडिल तिथले काम पाहत असत.

बुधवारी नेहमीप्रमाणे दोघे जण प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर, स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. स्वप्निलने तेथे गळफास घेतल्याचे दिसून आले.

या घटनेची माहिती तत्काळ आई वडिलांना दिली. त्यानंतर जवळील रूग्णालयात स्वप्निला उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

स्वप्नील एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली.

त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, कोरोनामुळे मुख्य परीक्षा झाली नाही. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

काय लिहिलंय नेमकं चिठ्ठीत

कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं.

घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना!

मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत राज्य सरकारच्या चालढकल धोरणावर सुसाईट नोटमध्ये बोट ठेवले आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: