chitra wagh criticizes shiv sena: 'तुम्ही अफझल खानाप्रमाणे पाठीत खंजीर खुपसला'; चित्रा वाघ संतापल्या
मुंबई: विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनानंतर आता भाजपा विरुद्ध शिवसेना असा आरोप-प्रत्यारोपाचा वाद सुरू झाला आहे. १२ आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार यांनी ट्वीट करून भाजपाला २०१७ साली केलेल्या १९ आमदारांच्या निलंबनाची आठवण करून दिली. त्यावर भाजप नेत्या यांनी संजय राऊतांना ट्वीटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. वाघ यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर निशाणा साधताना शिवसेनेला अफजल खानाची उपमा दिली. (bjp leader chitra wagh criticizes mp and shiv sena over ) चित्रा वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय, यावरूनच कळतं की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे'. क्लिक करा आणि वाचा- पुढील ट्विटमध्ये त्या म्हणतात, 'अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्यानंतर पाठीत खंजीर खुपसला. पण तुम्ही हे विसरलात की जनतेचं चिलखत आम्ही परिधान केलं आहे. माका तुका हा सांगुचा हा, अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय. लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल.' क्लिक करा आणि वाचा- काय म्हणाले होते संजय राऊत? १२ आमदारांच्या निलंबनावरून महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत यांनी १९ आमदारांची आठवण करून दिली. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'भाजपा १२ आमदारांच्या निलंबनाचा निषेध करत आंदोलन करत आहे. पण प्रिय देवेंद्रजी, तुम्ही त्याच विधानभवनात २२ मार्च २०१७ रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करणं कसं विसरू शकता? हिंमत दाखवा आणि सांगा की तुमचा १९ हा स्कोअर १२ पेक्षा जास्त आहे.' क्लिक करा आणि वाचा- गळाभेट देखील झाली- फडणवीस १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईपूर्वी अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय झाले होते, हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. भाजपाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर मी स्वत: त्यांना मागे सारल्याचे फडणवीस म्हणाले. त्यानंतर या आमदारांनी भास्कर जाधव यांची माफी देखील मागितली. हे प्रकरण मिटल्यानंतर सर्व आमदार अध्यक्षांच्या दालनाबाहेर पडण्यापूर्वी भास्कर जाधवांसोबत त्यांची गळाभेट देखील झाली, असे फडणवीस विधानसभेत म्हणाले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: