“नारायण राणे यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी शिवसेनेला हटवणे कोणाच्या ऐपतीत नाही”
मुंबई । काल मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये राज्यातून नारायण राणे यांची वर्णी लागली. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार ते पाहणार आहेत. यामुळे कोकणात एकच जल्लोष करण्यात आला. यामुळे आता कोकणात भाजपची ताकद वाढणार आहे. यामुळे शिवसेनेला रोखण्यासाठी मदत होणार आहे.
यावर आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले की, सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी तरी सुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणे हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नाते तोडण्याचे काम कोणीही करू शकत नाही. एवढ्या मोठ्या महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात फक्त चार मंत्रिपदे मिळतात हेच मोठे दुःख आहे.
असे असताना प्रकाश जावडेकर यांच्या सारखा कार्यक्षम मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जातो, याचे दुःख फार मोठे असल्याचे विनायक राऊत यावेळी म्हणाले. त्यांनी भाजपवर आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली. राणे यांना मंत्रीपद मिळाल्यावर त्यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच ते म्हणाले, मुंबई आणि शिवसेना यांचे अभेद्य नाते मागच्या ३० वर्षांपासून आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि महाविकास आघाडीचाच भगवा मुंबई महापालिकेवर फडकेल, तो उतरवण्याची ताकद कोणामध्ये नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
काल नारायण राणे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. यामुळे राज्यात काही राजकीय गणित बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ताज्या बातम्या
तरुणाने शोधला मायलेज वाढवण्याचा भन्नाट उपाय; जाणून घ्या कसा वाढवतो गाडीचा मायलेज
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी झाली बेशुद्ध; नवऱ्यासोबत जे घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: