‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
पुणे । काल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे आमचे ध्येय आहे. पिंपरी चिंचवड शहरात किमान ५० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे.
५५ आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची की नाही ते योग्य वेळी ठरवू, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. यामुळे आगामी निवडणूकीत सोबत लढणार का? याबाबत कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे.
तसेच राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. सीबीआय, ईडी या यंत्रणांची प्रतिष्ठा केंद्र सरकारने धुळीला मिळवली आहे. या संस्थांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. असेही ते म्हणाले.
तसेच हे फार काळ चालणार नाही. असा यंत्रणांचा दुरुपयोग करणारे नेते फार काळ टिकत नाहीत. यंत्रणांना फक्त विरोधकांच्या घराचे पत्ते माहिती आहेत, सत्ताधारी नेत्यांचे दिसत नाहीत. आम्ही त्यांना सत्ताधाऱ्यांचे पत्तेही पाठवू, असे म्हणत त्यांनी या कारवाईबाबत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
आगामी निवडणूकीची दिशा लवकरच ठरवू. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, यासाठी त्यांनी आज बैठक घेतली. यावेळी शिवसैनिक उपस्थित होते.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचे काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
तसेच दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांनी विचारणा करावी. ओबीसी आरक्षणशिवाय निवडणूका न घेण्यासंबंधी मुख्यमंत्री बोलतील. असेही संजय राऊत यांनी स्पष्ठ केले आहे.
ताज्या बातम्या
नवऱ्याने धरला सावत्र मुलीशी लग्न करण्याचा हट्ट, पत्नी नाही म्हणाली तर उचलले टोकाचे पाऊल
स्टाईल मारायला गेला आणि गटारात तोंडावर पडला, व्हिडिओ बघून पोट धरून हसाल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: