मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

July 31, 2021 , 0 Comments

टोकियो ऑलिम्पिकचा सातवा दिवस भारतासाठी चांगला ठरला आहे. कारण बॉक्सिंगच्या उपांत्य फेरीत भारताच्या लव्हलिन बोर्गोहेन प्रवेश केला आहे. लव्हलिनने बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात तैपईच्या निएन चिनला पराभूत करत देशाचे दुसरे पदक निश्चित केले आहे.

लव्हलिनने बोर्गोहेनन निएन चीनला ४-१ ने हरवले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे. याआधी ऑलिम्पिक स्पर्धेत २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत विजेंदर सिंगने कास्य पदक मिळवून दिले होते.

तसेच २०१२ मध्ये मेरी कॉमने देशाला लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक मिळवून दिले होते. आता लव्हलिनने पदक निश्चित केले आहे. आता या पदकाचा रंग कोणता असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात राहणारी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली महिला खेळाडू आहे. बॉक्सिंगमध्ये येण्याआधी ती किक बॉक्सिंग करायची. इतकेच नाही, तर तिने किक बॉक्सिंग प्रकारात तिने राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले आहे.

लव्हलिन लहान असताना एकादा तिच्या वडिलांनी बाजारातून मिठाई आणली होती. त्या पेपरमध्ये बॉक्सिंगपटू मोहम्मद अली यांच्याबद्दल लिहिलेले होते. तेव्हा तिने मोहम्मद अली यांच्याबद्दल जाणून घेतले आणि तिथूनच बॉक्सिंमध्ये लव्हलिनची आवड निर्माण झाली.

सुरुवातीच्या काळात लव्हलिनाला खुप संघर्ष करावा लागला होता. तिच्या वडिलांचे एक छोटेसे दुकान होते. तिची आर्थिक परिस्थिती खुप हालाखीची होती. त्यामुळे तिला ट्रॅकसुटसाठीही पैसे नव्हते. डायटसाठीही तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

त्या तीन बहिणी होत्या. सर्वजण म्हणायचे की मुली काही करु शकत नाही. पण आई नेहमी सांगायची असे काही तरी करुन दाखवा की लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आता आईचे स्वप्न लव्हलिनने पुर्ण केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आप्पांनी मानले सर्वांचे आभार! त्यामागील कारण जाणून चाहते झाले भावूक…
दु:खद बातमी! माजी मंत्री आणि तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचे निधन
झी मराठीवरील या मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, त्यांच्याजागी सुरू होणार या नवीन मालिका


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: