सायरा बानूंना धीर द्यायला उद्धव ठाकरे आणि शरद पवार रवाना; शाहरुखनंही केलं सांत्वन; पहा फोटो..
मुंबई । काल दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सायरा बानू या आहेत. दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अनेक नेते बॉलीवूड कलाकार त्यांच्या घरी पोहोचले.
यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नवाब मलिक यांनी त्यांच्या घरी जाऊन सायरा बानू यांना धीर दिला. तसेच अनेक बॉलीवूड अभिनेते देखील यावेळी उपस्थित होते.
अभिनेता अनिल कपूरही दिलीप कुमार यांच्या पाली हिल येथील घरी पोहोचला होता. शाहरुख खान देखील उपस्थित होता. अभिनेता शाहरुखला सायरा आणि दिलीप कुमार मुलाप्रमाणे मानायचे. अनेक बॉलीवूड कलाकारांशी त्यांचे चांगले संबंध होते.
तसेच शरद पवार आणि त्यांची मोठी दोस्ती होती. शरद पवार यांनी त्यांना बघण्यासाठी जेजुरीला सायकलवर गेल्याचा किस्सा सांगितला. त्यांनी दिलीपकुमार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आठवणी ताज्या केल्या.
त्यांना फिल्मफेअर, दादासाहेब फाळके, पद्मभूषण असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांनी ६५ चित्रपटात काम केले होते. १९४४ साली त्यांचा पहिला चित्रपट आला होता. तर १९९८ मध्ये त्यांनी शेवटचा चित्रपट केला होता. त्यांचे जगभरात चाहते होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल त्यांनी जगाचा निरोप घेतला. यामुळे सर्वांनी दुःख व्यक्त केले.
ताज्या बातम्या
अगदी शेवटच्या क्षणात प्रीतम मुंडेंचे मंत्रिपद हुकले, पंकजाताईंचे ते ट्विट होतंय व्हायरल…
ब्रेकिंग! एकनाथ खडसेंना ईडीचे समन्स, प्रकृती खालावल्याने सर्वांचे लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा झाला मृत्यु, तरीही पत्नीने १४ महिन्यानंतर बाळाला दिला जन्म
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: