नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यावर मी फोन केला होता, पण…., राज ठाकरे यांनी केला खुलासा
पुणे । नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे यांनी शपथ घेतली. यामुळे कोकणात आनंद व्यक्त केला गेला. नारायण राणे दोन वर्षांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यांना लगेच मंत्रीपद दिल्याने अनेकजण नाराज झाले. असे असताना नारायण राणे यांचे अनेकांनी फोन करून अभिनंदन केले.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील फोन करून त्यांचे अभिनंदन केले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन गेला नसल्याचे राणे यांनी सांगितले. आता राज ठाकरे यांना देखील आपण राणे यांना फोन केला का? याबाबत विचारण्यात आले. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मी शुभेच्छा देण्यासाठी नारायण राणे आणि त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला होता. मात्र दोघांचेही फोन बंद होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा संपर्क करुन त्यांना शुभेच्छा देईल. असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन एवढे मोठे नाही की ते मला शुभेच्छा देतील असे नारायण राणे यांनी सांगितले होते. नारायण राणे आणि शिवसेना यांचे नाते सध्या कसे आहे, याबद्दल सर्वांना माहीती आहे. यामुळे चर्चा सुरू झाली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता दौरे करणार आहेत. यामुळे मनसे पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राज ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान नारायण राणे यांना केंद्रात अवजड उद्योगमंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे राज्यात शिवसेनेला ककाय फटका बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांना पंतप्रधान केले तरी शिवसेनेला काय फरक पडणार नाही, असे शिवसेना नेत्यांनी सांगितले आहे.
ताज्या बातम्या
लव्ह जिहाद असल्याचे सांगून पुण्यात जोडप्याच्या लग्नाला विरोध, धमक्यांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे..
एक परिवार, एक नोकरी? मोदी सरकार देणार घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, जाणून घ्या..
VIDEO; ब्रायफ्रेन्डनं दिलं गर्लफ्रेंडला प्रेमाचा मोबदला, केल दुसरीशी गुपचूप लग्न आणि मग पुढे…
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: