असा राजा जो जास्त उंचीच्या सैनिकांसोबत करायचा हे घाणेरडे कृत्य, वाचून अंगावर काटा येईल

July 03, 2021 , 0 Comments

देश-विदेशात एकापेक्षा एक क्रुर आणि विचित्र राजा महाराजा इतिहासाच्या पानांत तुम्हाला पाहायला मिळतील. कित्येक वर्षे लोटून गेली तरी लोक त्यांना लक्षात ठेवतात कारण त्यांनी कामच असे केलेले असते की त्यांना विसरणे अशक्य असते. कोणी आपल्या उदारतेसाठी प्रसिद्ध होते तर कोणी आपल्या क्रुरतेसाठी.

परंतु जगात असाही एक क्रुर शासक होता जो सैनिकांना त्यांच्या उंचीनुसार पगार द्यायचा. म्हणजे ज्याची उंची जास्त असायची त्याला जास्त पगार मिळायचा. तुम्हाला हे वाचायला विचित्र वाटले असेल पण हे खरे आहे.

ही कथा 250 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा पर्शा हे एक राज्य होते आणि काही वर्षांनंतर त्याचे जर्मनीमध्ये रूपांतर झाले होते. या राज्याचा राजा फ्रेडरिक विलियम होता आणि तो एक शांत आणि दयावान राजा होता.

त्याला आपली सेना वाढवायला खुप आनंद वाटायचा. तो राजा बनायच्या आधी सैन्यामध्ये ३८ हजार सैनिक होते आणि जेव्हा तो सत्तेवर आला तेव्हा हेच सैनिक वाढून ८३ हजार झाले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की राजा फ्रेडरिकला लांबलचक सैनिक खुप आवडायचे.

लांबलचक शिपायांची स्वतंत्र रेजिमेंट त्याने बनवली होती ज्याला त्याने नाव दिले होते पॉट्समॅन जायंट्स. या रेजिमेंटमध्ये सर्व सैनिक ६ फुटांपेक्षा जास्त उंचीचे होते. मजेची गोष्ट ही आहे की, त्याने ही रेजिमेंट युद्ध लढण्यासाठी बनवलीच नव्हती.

त्या रेजिमेंटच्या सैनिकांना तो आपल्या महालात बोलवायचा आणि त्यांना डान्स करायला लावायचा. तो जेव्हापण उदास व्हायचा त्या सैनिकांना बोलवायचा आणि नाचायला लावायचा. कधी-कधी तर तो त्यांना आपल्या पर्सनल रूममध्ये बोलवायचा आणि नाचायला लावायचा.

राजा फ्रेडरिक बद्दल असे म्हटले जाते की त्याने एक खास प्रकारचा रैक तयार केला होता. जे सैनिक आधीपासूनच सैन्यदलात आहे अशा सैनिकांना त्या रैकमध्ये टाकले जायचे आणि दोन्ही बाजून त्यांना ओढले जायचे. त्यांची उंची वाढवण्साठी तो असा विचित्र प्रकार करायचा.

यावेळी त्याच्या या विचित्र कृत्यामुळे अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. तुम्ही त्याच्या क्रुरपणाचा या घटनेपासून अंदाज लावू शकता की तो आपल्या सैन्यातील उंच सैनिकांना राज्यातील उंच स्त्रीयांसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध बनवायला सांगायचा.

३१ मे १७४० मध्ये त्याचा मृत्यु झाला होता. त्यावेळी त्याचे वय ५१ वर्षे होते. असे म्हणतात की ‘पॉट्सडॅम जायंट्स’ रेजिमेंटमध्ये लांबलचक सैनिकांची संख्या 3000 पर्यंत गेली होती. त्याच्या मृत्युनंतर अनेक वर्षे ही रेजिमेंट अस्तित्वात होती.

परंतु १८०६ मध्ये राजा फ्रेडरिक याचा मुलगा फ्रेडरिक ग्रेटने ही रेजिमेंट बंद केली आणि सगळ्या सैनिकांना एकत्र केले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: