दुर्गंध जाईल इतिहास राहील! मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला होणार सुरुवात
मुंबई । वरळी येथील ब्रिटीश कालीन बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थितीत असणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. २७ जुलैला हा कार्यक्रम होणार आहे.
हा एक दक्षिण आशियाई देशांमधील सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प आहे. यामुळे याकडे गेल्या काही वर्षांपासून लक्ष लागले होते. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी आता एक पोस्ट करून याबाबत आपणही या चाळीत राहत असल्याचे सांगून अनेक आठवणी सांगितल्या.
यामध्ये ते म्हणाले, आता मुंबईच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्राचा गृहनिर्माण मंत्री म्हणून माझा त्याला हातभार असेल, यासारखा काव्यात्मक न्याय मीळेल असे माझ्या आयुष्यात मला कधी वाटले नव्हते. चाळीच्या जीवनातील बरे वाईट पैलू मी ताडदेवच्या एका चाळीत लहानाचा मोठा होताना भरपूर अनुभवलेत.
चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं. तिथं घराचे दरवाजे जसे सताड उघडे असतात, तसेच शेजारंच्या मनाचेही. रक्ताचे नातेवाईक देणार नाहीत एवढा प्रेम, जिव्हाळा चाळीत मिळतो. पण त्याची किंमत वेगळ्य प्रकारे मोजावी लागते. मग ती नळावरच्या भांडणात असो, शेजारी चालणाऱ्या अंथोनी च्या हातभट्टीच्या अड्ड्यात असो.
मा. पवार साहेबांची दूरदृष्टी असावी, मला गृहनिर्माण खातं मिळाले. बी. डी. डी. चाळींना सुद्धा एक परंपरा
आहे. आश्चर्य वाटेल, पण मुळात ब्रिटिशांनी १९२० च्या सुमारास या चाळी बांधल्या त्या पहिल्या महायुद्धातील युद्धकैद्यांना ठेवण्यासाठी. दरम्यान महारष्ट्राच्या खेडोपाड्यातून स्वातंत्र्या नंतर हजारो कुटुंबं पोटासाठी मुंबईत येत होती.
१९४२ ची चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य, दलित पँथरचा उठाव, गिरणी कामगारांचा संप, अश्या अनेक ऐतिहासिक घटना या चाळीनी पाहिल्या. हाती घेतलं ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडायचं नाही, ही पवार साहेबांची शिकवण आठवून कामाला लागलो. पण १००% हाडाचे मुंबईकर असलेले मुख्यमंत्री मा. उद्घव ठाकरे यांनीसुद्धा माझ्या योजनेला मंजुरी दिली.
प्रत्येक घरात शौचालय, न्हाणीघर, नळ अशा सुविधा असलेले, त्यांच्या विद्यमान घरापेक्षा खूप प्रशस्त असं घर, त्यांना महविकास आघाडी सरकारतर्फे मोफत मिळणार आहे. मी अनुभवलेला घाण संडासांचा दुर्गंध, जिन्यांमधला कोंदट वास हद्दपार होईल. मराठीपण, त्याचा लढवय्या इतिहास, आणि त्याच्या साक्षीदारांच्या पिढ्या तिथे दिमाखात जगतील!
ताज्या बातम्या
‘काँग्रेसच्या सचिन सावंत सारख्या लुक्क्यावर मी बोलत नाही, कारण तेवढी त्याची औकात नाही’
टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पाकिस्तान भारताला हरवणार, शोएब अख्तरची भविष्यवाणी
कहाणी अशा सुंदर गुप्तहेर महिलेची जिला मिळाली होती ही भयानक शिक्षा, वाचा कोण होती ती महिला
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: