२६/११ च्या हल्लात कसाबला पकडणारे शहीद तुकाराम ओंबळे यांचा सन्मान, कोळी प्रजातीला दिले नाव

July 01, 2021 , 0 Comments

मुंबई । नुकत्याच कोळ्याच्या प्रजातींचा शोध लावणाऱ्या संशोधक टीमने त्यांचा उल्लेख Icius Tukarami असा केला आहे. सध्या दोन नव्या कोळ्याच्या प्रजातींचा शोध लागला असून त्यांचे शास्त्रीय नामकरण Icius tukarami असे करण्यात आले आहे.

मुंबई २६/११ च्या हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाबला आपल्या जीवाची पर्वा न करता पकडून ठेवणारे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावावरुन हे नाव देण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत.

महाराष्ट्रातील फिंटेला आणि आयकियस या दोन प्रजातींचे वर्णन’ या मथळ्याखाली हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तुकाराम ओंबळे यांना त्यांच्या शौर्यासाठी ‘अशोक चक्र’ या शौर्यपदकाने गौरविण्यात आले आहे.

तुकाराम ओंबळे यांनी दशतवादी अजमल कसाबला पकडून दिल्याने या हल्ल्यातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा पर्दाफाश करण्यास मोठी मदत झाली, असे तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी म्हटले होते. त्यांच्या या शौर्याचा सर्वांना अभिमान आहे.

संशोधक धृव प्रजापती यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे. एका प्रजातीला शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव आहे तर दुसऱ्या प्रजातीला धृव यांचे मित्र कमलेश चोळके यांच्या स्मरणार्थ Phintella Cholkei असे नाव देण्यात आले आहे.

शहीद ओंबळे यांच्या शौर्याची, बलिदानाची आठवण म्हणून त्यांचे नाव प्रजातीला देण्यात आल्याचे धृव यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांची आठवण देखील कायम राहणार आहे.  त्यांनी दहशतवादी कसाबला जिवंत पकडले. यावेळी कसाबने त्यांच्यावर २३ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते शहीद झाले.

ताज्या बातम्या

babitaji on fire! ‘तारक मेहता…’मधील बबीताचा रँप वॉक चर्चेत, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

ब्रेकिंग! शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर पडळकरांची गाडी फोडली

VIDEO: कोरोना लस घेताना महिला करत होती हाय व्होल्टेज ड्रामा, पहा मग आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय केलं


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: