‘ठाकरे सरकार आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे’ नारायण राणेंनी केली बोचरी टीका

July 27, 2021 , 0 Comments

मुंबई। “राज्यात संकटं येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी खोचक शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

काल (रविवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरपरिस्थितीची पाहणी केली. याचवेळी राणे- फडणवीस- दरेकर हे देखील काल कोकण दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली.

यावेळी पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
तुम्ही मदत मागायच्या आधीच मोदींनी पाठवली आहे. बाकीची मदत आम्ही मिळवून देऊ, कोणी मागायची गरज नाही. केंद्र कोणतीही मदत बाकी ठेवत नाही. केंद्र सर्व मदत देते.

आणि केंद्र सरकारकडे सारखीच मदत मागायची असेल, तर राज्य सरकार कशाला आहे? देऊन टाका राज्य केंद्राला चालवायला. इथे आम्ही वेटिंगवर बसलोय, असे नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांकडे पाहून हसत आपलं मत मांडलं.

मात्र राणेंच्या या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणेंवर पलटवार केला आहे. “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नसतो. पुरामुळे मृत्यू झालेल्या आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये,” असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव घेत लगावला आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करु नये. तसेच मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असे नाना पटोले म्हणाले.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: