राणे मंत्री झाल्याने कोकणवर आपत्ती!; शिवसेनेच्या मंत्र्यांने दिली 'ही' उपमा

July 27, 2021 0 Comments

जळगाव: 'केंद्रीय मंत्री आपत्तीतही राजकारण करत आहे. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली आहे', अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेनेचे उपनेते आणि मंत्री यांनी निशाणा साधला आहे. जळगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर ही टीका केली. ( ) वाचा: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आमदार निधीतून मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज सरदार पटेल लेवा भवनात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी पुराच्या आपत्तीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेतला. वाचा: गुलाबराव पाटील म्हणाले की, आणि पश्चिम महाराष्ट्रावर जी नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी सरकार काम करत आहे. या आपत्तीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली असल्याची टीका गुलाबरावांनी केली. आरोप-टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो. मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे पहिले कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अशा आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: