हैद्राबाद मुक्तिसंग्रामामधली सशस्त्र क्रांती गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांनी सुरु केली होती..
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे एक महत्वाचं पर्व मानलं जातं. या काळात अनेक लोकांनी क्रांतिकारी पाऊलं उचलली. यात मराठवाड्याचे एक धुरंधर क्रांतिकारी होते. ज्यांच्यशिवाय हा हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा लढा अपूर्ण आहे. ज्यावेळी इंग्रजांविरोधात बोलायला कुणी धजावत नव्हतं तेव्हा या स्वातंत्र्यसैनिकांनी सशस्त्र क्रांती घडवून आणायला हातभार लावला होता. तर जाणून घेऊया या भारताच्या लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल.
गोविंदभाई श्रॉफ. भारताचे स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती. २४ जुलै १९११ रोजी गोविंदभाई श्रॉफ यांचा कर्नाटकातल्या विजापूर मध्ये झाला. जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव होतं गोविंददास मन्नूलाल श्रॉफ. हैद्राबाद मुक्तिसंग्राम चळवळीतील स्वामी रामानंद तीर्थ यांचे खंदे समर्थक म्हणून म्हणून गोविंदभाई श्रॉफ यांची ओळख होती.
औरंगाबाद येथे शासकीय प्रशालेत शिकत असताना गणेशोत्सवात पुढाकार घेतल्यामुळे हेडमास्तरांनी केलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ ते औरंगाबाद सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादच्या चादरघाट हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिकच्या परीक्षेत गोविंदभाई संस्थानात पहिले आले. मद्रास विदयापीठाची इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी स्वातंत्र्य-चळवळीत भाग घेण्यासाठी शिक्षण स्थगित केले.
कोलकाता येथील सिटी कॉलेजमधून त्यांनी गणित विषय निवडून त्यातून त्यांनी बीएस्सी पूर्ण केली. औरंगाबादमध्ये त्यांनी शासकीय महाविद्यालयात शिकवण्याचे काम केले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून गोविंदभाई श्रॉफ यांनी १९३५ मध्ये गोखले स्कॉलर म्हणून कौतुकाची थाप मिळवली.
१९३७ मध्ये स्वातंत्र्य लढ्याची मराठवाड्याची सूत्र रामानंद तीर्थ यांच्याकडे आले. त्यावेळी गोविंदभाई यांनी नोकरी सोडून राजकारणात आले आणि रामानंद तीर्थ यांचे जवळचे सहकारी बनले.
भारतात जेव्हा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ सुरू होती, तेव्हा मराठवाड्यात हैद्राबादच्या निझामाविरोधात समांतर आंदोलन सुरू होतं. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याच्या दोन बाजू होत्या. एक म्हणजे चळवळी सत्याग्रह-आंदोलन आणि दुसरी बाजू म्हणजे भूमिगत चळवळ. सत्याग्रहाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं तर भूमिगत चळवळीचं नेतृत्व गोविंदभाईंनी केलं होतं.
भारत स्वातंत्र्य झाल्यावरही मराठवाडा निजामाच्या ताब्यात होता. भारतावर दबाव टाकण्यासाठी निजामाने रझाकार संघटना उभी केली. गोविंदभाईंनी निजामाला तोंड देण्यासाठी रणशिंग फुंकलं. निजामाविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढाई करता येणार नाही हे गोविंदभाई यांनी ओळखलं होतं. रझाकारांना तोंड देण्यासाठी सशस्त्र लढा देण्याची तयारी गोविंदभाईंनी दाखवली आणि त्यांनी लोकांना तसे आदेश सुद्धा दिले होते.
पत्रकं वाटणं, चळवळीसाठी लोकांना प्रेरित करणं अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमध्ये गोविंदभाई जातीने लक्ष घालत असे. त्यांचं व्यक्तिमत्व तरुण लोकांना प्रभावित करत असे. त्यांच्या एका आदेशावर तरुणांची गर्दी होत असे. मुक्तिसंग्रामात लोकांनी वापरलेली शस्रास्रे गोविंदभाईंनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आणि शेवटी ती सरकार दरबारी जमा केली.
हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून भाषिक राज्ये निर्माण करावीत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मराठवाडयाच्या विकासप्रश्नांसाठी त्यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण आणि खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. स्वातंत्र्य लढ्या बरोबरच त्यांनी मराठवाड्यातिल व आंध्रातील शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली.
गोविंदभाई सरोफ यांनी स्वातंत्र्यलढ्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली. मराठवाडा विदयापीठाच्या स्थापनेसाठी, औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे एक न्यायपीठ स्थापन करण्यासाठी आणि औरंगाबाद रेल्वेच्या ब्रॉडगेजवर आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. अशा अनेक क्षेत्रात गोविंदभाई श्रॉफ यांनी आपल्या ताकदीच्या बळावर अनेक मोठमोठ्या धोरणांची अंमलबजावणी केली.
हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि मराठवाड्यातील जडणघडण यामध्ये गोविंदभाई श्रॉफ यांचं योगदान बघून भारत सरकारने त्यांना पदमभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. २१ नोव्हेम्बर २००२ साली वृद्धापकाळाने गोविंदभाईंचं निधन झालं. पण ज्या ज्या वेळी हैद्राबाद मुक्तिसंग्रामाबद्दल बोललं जातं तेव्हा गोविंदभाई यांचं नाव अगत्याने घेतलं जातं.
हे हि वाच भिडू :
- शंकरराव चव्हाणांचा सत्कार करून युती शासनाने काँग्रेस फोडायची बीजे रोवली होती..
- निजामाच्या काळापासून मागणी होत होती, अंतुलेनी ४ महिन्यात जालना जिल्हा बनवून टाकला.
- स्वामीजींचे तीन पीए जे पुढे आपापल्या राज्याचे मुख्यमंत्री बनले, यातला एक पंतप्रधान झाला..
- भारताची पहिली महिला शाहीर, त्यांना घाबरून महाराष्ट्रातून हद्दपार केलं गेलं होत
The post हैद्राबाद मुक्तिसंग्रामामधली सशस्त्र क्रांती गांधीवादी गोविंदभाई श्रॉफ यांनी सुरु केली होती.. appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: