“मंत्रिमंडळात स्थान न देऊन भाजपने उदयनराजेंचा अवमान केला, त्यांचा केवळ राजकीय वापर केला”

July 12, 2021 , 0 Comments

मुंबई । नुकताच भाजपचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातून चार खासदारांनी शपथ घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांना यामध्ये स्थान देण्यात आले नाही. यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले.

उदयनराजे यांना या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळेल असे सर्वांना वाटत होते. अगदी सुरुवातीपासून त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र शेवटी त्यांना मंत्रीपद नाकारले गेले. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, उदयनराजे भोसले यांना भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंच अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही. अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

ते म्हणाले, शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला चांगली माहीत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपाने अन्याय केला आहे. असेही ते म्हणाले.

त्यांना संधी मिळाली असती तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी ते चांगले झाले असते. यामुळे सातारामधील त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. असेही शशिकांत शिंदे म्हणाले. दरम्यान नारायण राणे यांचा देखील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला आहे. यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत.

ताज्या बातम्या

नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यावर मी फोन केला होता, पण…., राज ठाकरे यांनी केला खुलासा

लव्ह जिहाद असल्याचे सांगून पुण्यात जोडप्याच्या लग्नाला विरोध, धमक्यांमुळे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे..

पुढील दोन दिवस धोक्याचे; 16 लाख किमी वेगानं येतंय एक वादळ, सावधान राहा नाहीतर…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: