खेडमध्ये दरडीखाली आढळले ८ मृतदेह; ९ गावकरी अजूनही बेपत्ता

July 26, 2021 0 Comments

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यातील बौद्धवाडी व येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारपर्यंत ८ मृतदेह आढळले आहेत. यापैकी ७ मृतांची ओळख पटली आहे. दरम्यान, ९ जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. ( ) वाचा: तुफान पावसामुळे पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथे दरड दुर्घटना घडली असून खेड पोलीस, महसूल विभाग, एनडीआरएफ व लष्कर स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहे. गेल्या चार दिवसांपासून अविश्रांतपणे या यंत्रणा दगड आणि मातीचा ढिगारा उपसत आहेत. आतापर्यंत ८ मृतदेह ढिगाऱ्याखाली आढळले असून त्यातील सात जणांची ओळख पटली आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे... पोसरे बौद्धवाडी विहान सुदेश मोहिते (वय ५), धोडीराम देऊ मोहिते (वय ७१), संगीता विष्णु मोहिते (वय ६९), सविता धोडीराम मोहिते (वय ६९), सुनीता सुनील मोहिते (४५) बिरमणी जयश्री जयवंतराव मोरे ( वय ६५), जयवंत भाऊराव मोरे (वय ७०) वाचा: नेमकं काय घडलं होतं? राज्यात तुफान पावसाने हाहाकार उडाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, , लांजा, संगमेश्वर आणि राजापूर या तालुक्यांना बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. खेड तालुक्यातील पोसरे गावातही डोंगर खचला आणि भूस्खलन होऊन पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथे अनेक घरे गाडली गेली. गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी बचावकार्य सुरू असून अद्याप ९ गावकरी बेपत्ता असल्याने हे बचाव आणि मदतकार्य सुरूच राहणार आहे. राज्यात विविध भागांत दरडी कोसळून ११२ हून अधिक मृत्यू झाले असून ९९ जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा कोकणला महापुराचा तडाखा बसल्यानंतर मुख्यमंत्री प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन स्थितीचा आढावा घेत आहेत. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी महाड येथील तळिये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला व भरीव मदत करण्याचे आश्वासन पूरग्रस्तांना दिले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: