“ईडी अमित शहांच्या मुलाची चौकशी करणार नाही, त्यांची प्रॉपर्टी १० पटींनी वाढलीय”

July 02, 2021 , 0 Comments

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली आहे. पण त्यांची ईडी चौकशी करणार नाही. या तपासयंत्रणांचा दुरुपयोग भाजप करत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला राज्यात दिसत असल्याचे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी ईडीने छापे टाकले आहेत. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीाआय चौकशी व्हावी याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित मागणी केली आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शहांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, लोकांच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी. पण निरपराध लोकांवरही ईडी, सीबीआय लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. या यंत्रणांचा चुकीचा वापर भाजपकडून केला जात आहे. अशी टीका देखील अनेकांकडून केली जात आहे.

पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील आरोप केले आहेत. प्रधानमंत्री सहाय्यता निधीत झालेल्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले आहेत. मग त्यांचीही ईडीची चौकशी व्हावी?, अशी मागणी पटोलेंनी केला आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

आता नाना पटोलेंच्या या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या चौकशीवरून राज्य सरकार आणि भाजप नेत्यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. आता अजित पवारांची चौकशी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची चौकशी झाली तर हा वाद अजून चिघळणार आहे.

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

मधूचंद्राच्या रात्री बायकोने प्रेमाने नवऱ्याला आणून दिलं दूध; त्यानंतर त्या रात्री जे झालं ते भयानकच होतं

‘हे’ आजोबा आहेत जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती; गिनीज बुकमध्ये आले नाव, वय वाचून धक्का बसेल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: