आयटीसी घोटाळा: चार कंपनी मालकांना अटक; तपासात धक्कादायक बाब उघड

July 30, 2021 0 Comments

नागपूर: अस्तित्वात नसलेल्या प्रतिष्ठानांच्या आधारे सुमारे ५३.९५ कोटींची बनावट देयके सादर करून १०.७९ कोटी (आयटीसी) मिळविणाऱ्या चौघांना महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या () झोनल युनिटने अटक केली आहे. ( ) वाचा: जीएसटी विभागातर्फे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरू आहे. या अंतर्गत विविध ठिकाणी छापा टाकण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान केवळ कागदावर अस्तित्व असलेल्या चार प्रतिष्ठानांच्या माध्यमातून आयटीसी मिळविण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. कंपनीच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली. या कागदपत्रांवरील कार्यालयीन तसेच कंपनीचा पत्तादेखील प्रत्यक्षात उपलब्ध नव्हता. चारही कंपन्यांच्या नोंदणीसाठी एकसारखी कागदपत्रे सादर करण्यात आली. स्टील आणि लोखंडाचा व्यवसहार करत असल्याचे दाखवित आरोपींनी ५३.९५ कोटींचे आर्थिक व्यवहार कागदोपत्री केले. गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे आर्थिक व्यवहार झालेत. दरम्यान मागील दोन दिवसात चौघांना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, हे चौघेही कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त संचालक यांनी दिली. वाचा: महिन्याभरात पाच जणांना अटक इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी १ जून ते २९ जुलैदरम्यान ही चौथी कारवाई आहे. चारही कारवायांमध्ये बनावट देयके, खोटी कागदपत्रे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या नावाने व्यवहार दाखविण्यात आले. जुलै महिन्याचा विचार करता ५ आणि १४ जुलैला कारवाई झाली होती. १४ जुलैच्या कारवाईत एका आरोपीला उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथून अटक करण्यात आली होती. असे महिन्याभरात पाच जणांना अटक करण्यात विभागाला यश आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: