मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत, बड्या अभिनेत्यांना कधी जाग येणार?

July 29, 2021 , 0 Comments

कोल्हापूर । राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार सुरू आहे. राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसला आहे. अनेक नद्यांना मोठा पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यामुळे अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत.

आता हे नागरिक मदत मागत आहेत, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सध्या पाहणी दौरे सुरू केले असून लवकरच मदत देऊ असे आश्वासन दिले जात आहे. यामुळे फक्त आम्हाला आश्वासन नको लवकर मदत करा, अशी मागणी हे लोकं करत आहेत. अनेकांनी केवळ मदतीची घोषणा केली आहे.

असे असताना केवळ आश्वासन न देता अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी भोकरदनला भेट दिली अन् संवेदशील भावनेतून १० कोटींची मदतही जाहीर केली. यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पाहणी करून तिने लगेचच मदतीची घोषणा केली आहे.

दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन या गावाला भेट दिली. येथील परिस्थिती पाहून त्या स्थब्ध झाल्या. एकीकडे बॉलिवूड कलाकारांवर टीका होत असताना दिपाली यांनी जाहीर केलेली मदत ही फार मोठी आहे. यामुळे बड्या अभिनेत्यांपूढे एक आदर्श म्हणावा लागेल.

जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. लोकं रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झाले आहे. यामुळे येथे मदत करणे गरजेचे आहे.

याठिकाणी काहीच उरले नाही. दोन वर्ष कोरोना महामारीत गेली. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावंच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. देव किती परीक्षा घेणार? कोरोना येतोय, पूर येतोय, असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केले.

ताज्या बातम्या

भयानक! अमरनाथच्या गुफेजवळ ढगफुटी; सिंधू नदीला पुर आल्याचा व्हिडिओ आला समोर

टी 20 वर्ल्ड कपसाठी आपल्याच कर्णधाराचा पत्ता कट करून पृथ्वी शॉची संघात होणार निवड?, चर्चा सुरू..

५ वर्षात ३ लाखांचे झाले ११ लाख, तुम्ही देखील कमवू शकता, कशा प्रकारे जाणून घ्या..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: