९ वेळा आमदार, ५ वेळा खासदार आणि ६ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांचे निधन
शिमला । काँग्रेसचे मोठे नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन झाले आहे. ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेसचे ते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात होते. शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वीरभद्र सिंग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या उपचारात चढउतार होत होते. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी दोनवेळा कोरोनावर मात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अनेकजण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे. ते सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. हिमाचलच्या राजकारणातील ते एक बडे प्रस्थ होते.
काँग्रेस नेतृत्वाच्या ते जवळचे मानले जात होते. ते नऊ वेळा आमदार राहिले आहेत. तसेच पाचवेळा खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यामुळे एक बडे नेते म्हणून त्यांची देशात ओळख होती.
मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा २००९ मध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. ते पहिल्यांदा १९८३ मध्ये मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर ते १९९० पर्यंत या पदावर होते. ते १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ असे मुख्यमंत्री राहिले होते. यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसने एक अनुभवी नेता गणावला आहे.
ताज्या बातम्या
राज्यात मान्सून परतणार; पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार चांगला पाऊस
सायरा बानूंना धीर द्यायला उद्धव ठाकरे आणि शरद पवार रवाना; शाहरुखनंही केलं सांत्वन; पहा फोटो..
VIDEO: विदाई होत असताना नवरदेवाचा चेहरा बघताच नवरी लागली रडायला; पहा नक्की काय झालं
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: