कोरोनानंतर पहिलीच मोठी भरती, राज्यात शिक्षक सेवकांची ६१०० रिक्त पदे भरणार, जाणून घ्या..
मुंबई । सध्या कोरोनामुळे अनेकांचे हाल सुरू आहेत. अनेकांचे रोजगार यामुळे गेले आहेत. असे असताना आता राज्यातील शिक्षण सेवकांची रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये राज्यातील सुमारे ६ हजार १०० शिक्षण सेवकांची पदे आता भरली जाणार आहेत. अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत यामध्ये घेतली जाणार आहे.
यामधून अंतिम निवड करण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे इच्छुकांसाठी ही एक मोठी संधी आहे. ही पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पदभरतीचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आता रिक्त असलेली शिक्षण सेवक पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार लवकरच याबाबत सविस्तर प्रक्रिया पार पडणार आहे. वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पवित्र पोर्टलद्वारे सुमारे ६१०० पदांसाठी शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर बंदी घातली होती. यामुळे पदभरती लवकर सुरू करण्याची मागणी केली जात होती. गेल्यावर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली होती.
आता मात्र वर्षा गायकवाड यांनी हा एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून भरतीची वाट बघणारे आता याची तयारी करत आहेत.
ताज्या बातम्या
“भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”
“नारायण राणे यांना उद्या पंतप्रधान बनवले तरी शिवसेनेला हटवणे कोणाच्या ऐपतीत नाही”
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी झाली बेशुद्ध; नवऱ्यासोबत जे घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: