UPSC ची तयारी करण्याऱ्यांना IPS अंकीता शर्माने दिला यशस्वी होण्याचा कानमंत्र; लेटर झालं व्हायरल
अधिकारी होणं हे अनेकांचे स्वप्न असते. ते पुर्ण झाल्यानंतर अनेक अधिकारी स्वत:ला फक्त नोकरी पुरतं मर्यादीत ठेवत असतात. आयपीएस म्हटलं तर नोकरी सोडून दुसरं काही करण्यासाठी त्याच्याकडे तर वेळ नसतो, कारण आयपीएस हा २४ तास ऑन ड्युटी असतो.
अशात आम्ही आज ज्या महिला आयपीएसबद्दल तुम्हाला सागंणार आहोत, त्या जरा यापेक्षा वेगळ्या आहे. या महिला आयपीएसचे नाव अंकीता शर्मा असे आहे. अंकीता शर्मा छत्तीसगडच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहे.
अंकीता शर्मा पोलिसच्या ड्युटीसोबतच ज्या विद्यार्थ्यांना युपीएससी पास करायची आहे, त्यांची तयारी करुन घेत असतात. आता अंकीता शर्मा यांचे एक लेटर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ते पत्र त्यांनी युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी लिहिले होत.
अंकीता शर्मा म्हणतात, त्यांना यशस्वी झालेल्या लोकांचे आत्मचरीत्र वाचण्याचा छंद आहे. गेल्याच महिन्यात टेनिस खेळाडू मारीया शारापोवाचे आत्मचरीत्र ‘Unstoppable My Life So Far’ हे वाचत होती. त्याच्याशीच प्रेरणा घेऊन मी एक पत्र युपीएससीची तयारी करणाऱ्या लोकांसाठी लिहिले आहे.
हे पत्र त्या सर्व उमेदवारांसाठी आहे, जे युपीएसची तयारी करत आहे, पण अपयशाची भिती बाळगत आहे, असे अंकीता शर्मा यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर हे पत्र चांगलच व्हायरल झाले आहे. आतापर्यंत ९४३ लोकांनी या पत्राला रिट्विट केले आहे, तर ७ पेक्षा जास्त लोकांनी या पत्राला लाईक केले आहे.
अंकीता शर्मा म्हणतात, यश आणि अपयश हे जीवनाचे अविभाज्य भाग आहे. यश मिळवण्यासाठी अपयशाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा ज्यामुळे तुम्हाला अपयश येत आहे, त्याची कारणं शोधली पाहिजे, त्याला तुम्ही तुमची ताकद बनवली पाहिजे.
अपयशापासून नेहमी शिकत राहिले पाहिजे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित होते, की तुम्हाला एकदिवस यश नक्की मिळणार. युपीएसची तयारी करणाऱ्यांसाठी एक गोष्ट महत्वाची आहे, की त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्य मर्यादांना कधी कमजोरी नाही समजलं पाहिजे.
आपल्या घरच्या परीस्थीतीला कधीच तुमच्या यशाच्या आड येऊ दिलं नाही पाहिजे. तुम्हाला श्रीमंत असो वा गरीब कधीच तुमच्या यशामध्ये तुमची परिस्थिती आली नाही पाहिजे. तुम्ही शहरात राहत असो वा ग्रामीण भागात फक्त तुमच्या यश गाठण्याची चिकाटी असायला हवी.
तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेला महत्व दिले पाहिजे. इंग्रजीमध्ये यश मिळेल याची गॅरंटी कोणी नाही, देऊ शकत. त्यामुळे जी तुमची मुळ भाषा आहे, ज्या भाषेवर तुम्हाला चांगली जमते तिच भाषा निवडली पाहिजे, असे अंकीता शर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.
To all those Innocent minds, who have decided to fight, but somehow, fear failure.
To all the #UPSC aspirants, who have decided to appear for the exam, who are the future craftsman of the nation.
Bcz you DM me, so A small message to you all before your exams.
Best wishes!! pic.twitter.com/rIgjm3ssN4— Ankita Sharma IPS (@ankidurg) May 17, 2021
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाबाबत मोठे वक्तव्य, म्हणाले,..
अक्षयला बसला जबरदस्त मानसिक धक्का, म्हणाला, ‘मिल्खा सिंग यांच्याबाबत ती खंत कायम राहील
मोठी बातमी! ‘क्राईम पेट्रोल’मधील दोन अभिनेत्रींना चोरी केल्याप्रकरणी अटक
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: