paranjape brothers released: मुंबई पोलिसांच्या चौकशीनंतर परांजपे बंधुंची सुटका; पुण्यात परतले

June 26, 2021 0 Comments

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे या परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सोडून दिले आहे. काल पुण्यातील घरातून त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परांजपे कुटुंबातील सदस्य आणि कंपनीचे संचालक अमित परांजपे यांनी एक व्हिडीओ जारी करत हे स्पष्ट केले आहे. (Builder after ) पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. यांनी बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केली अशी तक्रार मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. वसुंधरा डोंगरे यांनी ही तक्रार दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक आणि विश्वासघात करणे असे परांजपे बंधूवर आरोप करण्यात आले होते. क्लिक करा आणि वाचा- वसुंधरा डोंगरे यांच्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस ठाण्यात कलम ४७६, ४६७, ६८, ४०६, ४२० आणि १२० ब अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. तक्रारदार या वारस असतानाही त्यांच्या कोणतीही माहिती न देता जमिनीची विक्री करण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर वसुंधरा डोंगरे यांनी रितसर पोलिसात तक्रार केली होती (Dispute in Pune famous Builder Paranjape brothers family over property issue) क्लिक करा आणि वाचा- परांजपे बंधूंचे 'हे' स्पष्टीकरण विलेपार्ले पोलीस ठाण्यात गैरसमजुतीतून तक्रार दाखल केली होती. परांजपे कुटुंबीयांच्या मिळकतीतील हिश्श्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आली होती, असे परांजपे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. या संदर्भात श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि त्यांच्या चुलत भावंडांना त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी मुंबईत बोलावण्यात आले होते. परांजपे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत, असे परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडचे संचालक अमित परांजपे यांनी सांगितले आहे. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केले असल्याचे अमित परांजपे यानी सांगितले. हा विषय कौटुंबिक मिळकतीतील हिस्सेदारीशी संबंधित असून या प्रकरणाचा परांजपे स्किम्स या कंपनीशी आणि व्यवसायाशी काहीही संबंध नाही, असेही परांजपे यांनी सांगितले. माझे वडील शशांक परांजपे आणि काका श्रीकांत परांजपे यांची मुंबईत प्राथमिक चौकशी केली गेली. त्यानंतर पुण्यात परतले आहेत, अशी माहिती अमित परांजपे यांनी दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: