धक्कादायक: BMCच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडले रुग्णाचे डोळे

June 23, 2021 0 Comments

मुंबई: मुंबई महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत महापौर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ( Mumbai ) वाचा: राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या २४ वर्षीय रुग्णाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच श्रीनिवास याला या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती आधीच नाजूक आहे तसेच तो बेशुद्धावस्थेत आहे. असे असतानाच रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्रीनिवास याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे नातेवाईकांना दिसले. उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे तेथील नर्सला त्यांनी याबाबत सांगितले मात्र, संबंधित नर्सकडून उलट उत्तरे मिळाली, असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली असता त्यांनी तपासणीनंतर उंदराने डोळ्यांचा चावा घेतला असावा, असे दिसत असल्याचे सांगितले. रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनीही उंदराने डोळ्याचा चावा घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे म्हटले आहे. हा अतिदक्षता विभाग तळमजल्यावर आहे. येथे उंदरांचा वावर असतो, असेही त्यांनी मान्य केले आहे. वाचा: राजावाडी रुग्णालयातील या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे. संबंधित रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्या आणि आजूबाजूचा भाग उंदराने कुरतडल्याचे दिसत आहे. ही बाब निश्चितच खेदजनक आहे. याबाबत रुग्णालयाच्या अधिष्ठाता ठाकूर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापौरांनी नमूद केले दरम्यान, संचालित रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अशी घटना घडल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अतिदक्षता विभाग हा रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचा विभाग असतो. चिंताजनक स्थितीतील रुग्णांवर या विभागात उपचार करण्यात येत असतात. असे असताना या विभागात रुग्णसेवा देणाऱ्या सबंधितांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: