'हसन मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागितली, त्यात चूक काय?'

June 20, 2021 0 Comments

कोल्हापूर: शहराच्या थेट पाइपलाइन योजनेच्या संदर्भात श्वेातपत्रिका काढण्याची आमची तयारी आहे, असे प्रसिद्धीपत्रक काँग्रेस, व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी प्रसिद्धीला दिले आहे. या योजनेचे ८० टक्के काम पूर्णत्वाला आले असून याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, , भाजप व ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी करण्याचीही आमची तयारी असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. ( ) वाचा: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी २०१५ मध्ये परवानगी मागितली होती, मात्र प्रत्यक्षात ती २०१८ मध्ये मिळाली. वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसल्यामुळे त्या विभागाने या योजनेच्या कामावरील यंत्रसामुग्री जप्त केली होती. तसेच करोना महामारीमुळे कर्फ्यू होता, त्यामुळे सर्वच कामे बंद होती, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वाचा: कोल्हापूर शहराच्या थेट पाइपलाइन योजनेबद्दल ग्रामविकास मंत्री यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून कोल्हापूर वासीयांची जाहीर माफी मागितली. यामध्ये चूक काय? असा सवालही या पत्रकात करण्यात आला आहे. या पत्रकावर माजी महापौर आर. के. पोवार, माजी महापौर नीलोफर आजरेकर, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक आदिल फरास, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, काँग्रेसचे पक्षप्रतोद दिलीप पोवार, माजी नगरसेवक विनायक फाळके, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी नगरसेवक पिंटू राऊत, शिवसेनेचे माजी गटनेते नियाज खान आदी प्रमुखांच्या सह्या आहेत. १०० टक्के निधी खात्यावर जमा आहे थेट पाइपलाइन योजनेच्या निधीचे शंभर टक्के पैसे महापालिकेच्या खात्यावर जमा आहेत. ॲडव्हान्समध्ये पैसे जमा असणारा कदाचित हा राज्यासह देशातील पहिलाच प्रकल्प असेल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: