“प्रीवेडिंगवाल्यांना त्रास देऊ नका, ते हनिमूनसाठी पण इथेच आले पाहिजेत”

June 05, 2021 , 0 Comments

रायगड । काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रीवेडिंग शूटसाठी येणाऱ्यांना अडवू नका. हनिमूनसाठी पण इथेच आले पाहिजेत असे सांगत पोलिसांनी दांपत्यांना चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला.

अजित पवार म्हणाले, आजकाल लग्न ठरले की प्रीवेडिंग शूटिंग करतात. यासाठी अनेक मुले मुली श्रीवर्धनमध्ये येतात. शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाल्याचे ऐकायला येत. त्यांना इथे रोखले जाते. पुढे हे प्रकरण वाढत पोलीस ठाण्यात जाते.

पण प्रीवेडिंगला आलेल्या जोडप्याला इतकी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनिमूनलाही येथेच आले पाहिजे. हनिमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही येथेच आले पाहिजे. यामध्ये आपलाच फायदा आहे. यामुळे उत्पन्नाचे साधन तयार होईल, असेही अजित पवार म्हणाले.

तसेच आमचीच मुलगी येथे आमदार असून बापाच्या नात्याने तिला पैसे कमी पडू देणार नाही. तुम्ही काळजी करु नका. आम्हा सर्वांचे लक्ष असून लागेल ती मदत करु. असे म्हणत अजित पवारांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे. अदिती चांगले काम करत आहे.

ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. पैसे व्यवस्थित खर्च करा, कामे दर्जेदार करा, केलेली कामे टिकली पाहिजेत, असेही अजित पवार उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले. यावेळी अधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते.

शरद पवारांनी अनेक वादळे पाहिली असून त्यांनी शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. शेतकऱ्यांना उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया करावा ही त्यांची इच्छा असल्याचेही म्हटले. त्यांचे या भूमीवर प्रेम असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

ताज्या बातम्या

‘देवमाणूस’मधील दिव्या सिह रिअल लाईफमध्येही दिसतीय तितकीच सुंदर; पहा फोटो

भारतीय क्रिकेट संघाला मिळणार दोन कॅप्टन; विराट कोहलीने दिले स्पष्ट संकेत

..जेव्हा करूणानिधींना त्यांच्या घरातून पोलिसांनी फरफटत बाहेर काढले होते, वाचा पुर्ण किस्सा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: