५ ते १० रूपयांचे हे स्वस्त सामान विकून कमावले करोडो रूपये, वाचा पती-पत्नीची यशोगाथा
जर फक्त नोकरी करून तुम्ही तुमचे आयुष्य जगू शकता का असा प्रश्न जर लोकांना विचारला तर त्यातील फार कमी लोकांचे उत्तर होय असे येईल. बरेच लोक काम करताना व्यवसायाच्या अनेक कल्पना शोधतात, परंतु प्रत्येकाला यश मिळत नाही.
जर तुमच्याकडे व्यवसायाची कल्पना असेल तर आपल्याकडे बरेच काही असावे लागते. आपण ज्या व्यवसायाचा विचार करीत आहात तो यशस्वी होईल की नाही याबद्दल आपल्याला संशोधन देखील करावे लागेल.
जर यश मिळवण्याची जिद्द असेल तर अगदी लहान उत्पादनातूनही कोट्यावधी रुपये कमवू शकता. ५-१० रुपयांचे स्नॅक आयटम विकूण कंपनीचे मालक प्रभु गांधीकुमार करोडो रूपये कमवत आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या यशाची यशोगाथा सांगणार आहोत.
प्रभू यांनी टीएबीपी स्नॅक्स अँड बेव्हरेजसची स्थापना केली. यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसमवेत ऑन फिल्ड संशोधन केले. तमिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये मुख्यालय असलेली त्यांची ५ वर्षांची कंपनी स्नॅक्स आणि शीतपेये तयार करते, ज्याची किंमत ५ ते १० रुपये आहे.
मुळात प्रभु यांची कंपनी विशेषत: मध्यमवर्गिय आणि गरीब लोकांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवते. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीला ३५.५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. २०१७ पासून कंपनीच्या व्यवसायात ही वाढ ३५० टक्क्यांहून अधिक आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणासह अनेक राज्यांमधील स्थानिक स्टोअर्स, पेट्रोल पंप आणि सुपरमार्केटमध्ये टीएबीपी स्नॅक्स आणि बेव्हरेजचे पदार्थ उपलब्ध आहेत. कंपनी ओडिशामध्ये आता आपला व्यवसाय वाढवणार आहे.
तसेच लवकरच महाराष्ट्र आणि गोव्यात व्यवसाय सुरू करणार आहे. म्हणजेच अवघ्या ५ वर्षात प्रभु यांच्या कंपनीचा व्यवसाय सुमारे दहा राज्यात पसरला आहे. द बेटर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आपण हे समजणे खुप आवश्यक आहे की आपले ग्राहकांना काय पाहिजे आहे.
हे माझ्या यशामागचे रहस्य आहे. जोपर्यंत तुम्हाला योग्य बिझनेस मॉडेल सापडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला नुकसानाचा सामना करावाच लागेल. ही प्रोसेस खुप महाग आणि वेळ लावणारी असू शकते. प्रभु यांच्या कंपनीची पेय उत्पादन क्षमता १२०० बाटल्या प्रति मिनिटे आहे.
दर वर्षाला जवळपास २.५ करोड बाटल्या ही कंपनी बनवते. प्रभु यांत्रिकी अभियंता आहेत. ते उद्योजकांच्या कुटुंबात जन्माला आले होते. परंतु कौटुंबिक व्यवसाय हातात घेण्यापूर्वी त्यांनी अनुभवासाठी किरकोळ सल्लागार म्हणून एका खासगी कंपनीत काम केले.
ते अमेरिकेत सहा वर्षे राहिले आणि २०१२ मध्ये वडिलांना मदत करण्यास सुरूवात केली. ते स्वताच्या कामावर असमाधानी होते म्हणून प्रभू यांनी एफएमसीजी उद्योगासह अनेक क्षेत्रांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
प्रभू यांची पत्नी वृंदा यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक वितरकांना आमची कंपनी उत्पादनांवर मुक्तपणे त्यांच्या समस्या आणि टीका करण्याची परवानगी देते ज्यामुळे कंपनीला आवश्यक बदल समजण्यास मदत होते. कंपनी सध्या ७०० वितरकांसह कार्य करते आणि १ लाख १९ हजार स्टोअरमध्ये उत्पादने वितरीत करते.
येत्या चार वर्षांत पती-पत्नीची जोडी ५,००,००० दुकाने व्यापून २०० कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देण्याची अपेक्षा ठेवत आहे. येणाऱ्या वर्षात त्यांची कंपनी दुप्पट नफा कमावू शकते अशी त्यांची आशा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.
महत्वाच्या बातम्या
आण्णाची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही, लग्न करण्यासाठी बघितली होती ९ वर्ष वाट
भारतातील या तज्ञाने बनवल्या आहेत शेणापासून सिमेंट, विटा, पेंट; आता इतरांना देतोय प्रशिक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रिचार्जसाठी मिळणार ‘एवढे’ पैसे
पैशांच्या लालसेपोटी सासऱ्याने सुनेलाच ८० हजाराला विकले, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: