मुंबईकरांसाठी मोठी बातमी; 'हा' प्रकल्प पाण्याचं टेन्शन कायमचं मिटवणार!

June 29, 2021 0 Comments

मुंबई: मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन कायमचं मिटावं, करदात्या नागरिकांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावं, यासाठी महापालिकेने महत्त्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. मुंबईतील पहिल्या प्रकल्पाबाबत पालिकेने मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आय.डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीज या इस्रायली कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून त्या माध्यमातून २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. मालाड येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून २०२५ मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्ष सुरू होईल, असा विश्वासही पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. ( Update ) वाचा: सह्याद्री अतिथीगृह येथे व आय.डी. ई. वॉटर टेक्नॉलॉजीज या इस्रायली कंपनीदरम्यान नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार झाला. यावेळी पालिका आयुक्त यांनी प्रकल्पाचे स्वरूप, विस्ताराची क्षमता आणि वैशिष्ट्ये सांगितली. वाचा: नि:क्षारीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि अन्य ठळक बाबी - २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता - मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी - अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणी कपातीस सामोरे जावे लागते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्त्रोताचा विकास. - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मालाड मनोरी येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी. - मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने चांगली असून समुद्राचे पाणी उचलून नि:क्षारीकरण प्रकल्पात आणण्याकरिता तसेच प्रक्रियेनंतरच्या क्षाराच्या निर्गमनाकरिता खुल्या समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. मानवी वस्ती, शेत जमीन, मासेमारी जेट्टी ही दूर असून सर्व निकषांवर पात्र ठरणारी ही जागा नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी सुलभ व सोयीची आहे. - करार झाल्यापासून १० महिन्यांच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करताना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भूपृष्ठीय सर्वेक्षण, भूभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमीनीवरील), डिफ्युजर, खाऱ्या पाण्याच्या निर्गमनाच्या रचनात्मक बाबींची गणितीक प्रतिकृती , समुद्राच्या पाण्याच्या आदान तसेच क्षाराच्या निर्गमनाचे स्थळ निश्चित करून संकल्प चित्रे तयार करणे, किनापट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास व त्याअनुषंगिक परवानग्या प्राप्त करण्याची कामे हाती घेण्यात येतील. - सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प बांधकामाकरिता मुंबई महानगरपालिकेतर्फे सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून पुढील कार्यवाही केली जाईल. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: