'मातोश्रीने आमच्यासाठी दार बंद केले; आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केले नाही'

June 03, 2021 0 Comments

नांदेड: विरोधी पक्षनेते यांनी मुंबईत सिल्व्हर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेतल्यानंतर व पाठोपाठ ते यांच्याही घरी पोहचल्यानंतर त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू झालेली टोलेबाजी अद्याप थांबलेली नाही. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी खोचक विधान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. ( ) वाचा: देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड येथे शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मातोश्रीचा उल्लेख करत सूचक विधान केले. 'देवेंद्र फडणवीस शरद पवार यांच्या घरी गेले. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या घरी ते पोहचले. असेच एक दिवस ते मुख्यमंत्री यांचे निवासस्थान मातोश्रीवरही येतील', असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ' 'ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही' असे मोजकेच पण महत्त्वाचे उत्तर फडणवीस यांनी दिले. तर त्याआधी परभणी येथे बोलताना संजय राऊत यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. वाचा: भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय म्हणाले ते मी ऐकलं आहे. सध्या जी राजकीय स्थिती आहे ते पाहता राऊतांनी एकप्रकारे आमंत्रणच दिले आहे. हे आमंत्रण आम्ही स्वीकारले आहे, असे विधान शेलार यांनी केले आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि नंतर एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिल्यानंतर संजय राऊत यांनी या भेटीगाठींवर महत्त्वाचे विधान कले होते. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या घरी गेले हे पाहून मला आनंद झाला. त्याआधी ते शरद पवार यांच्याही घरी गेले होते. याचा अर्थ राज्यातला विरोधी पक्ष हळूहळू जमिनीवर येऊ लागला आहे. राजकारणात कायमचा शत्रू कुणीच नसतो. केवळ वैचारिक मतभेद असतात. पण, लोकशाहीत संवाद असायला हवा. सरकारनं विरोधकांशी आणि विरोधकांनी सरकारशी बोलत राहायला हवं. महाराष्ट्रात ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. एक दिवस ते मातोश्रीवरही येतील, असे राऊत म्हणाले होते. त्यानंतर भाजपमधून त्यावर उत्तरादाखल प्रतिक्रिया येत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: