राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा! ५० लाखांचे पहिले बक्षीस, जाणून घ्या..

June 03, 2021 , 0 Comments

मुंबई । सध्या राज्यात कोरोना रूग्णवाढीचा दर काहीसा कमी होताना दिसत आहे. असे असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी याची घोषणा केली आहे. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. सहा महसूल विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत.

या बक्षिसाची एकूण रक्कम पाच कोटी ४० लाख रुपये असेल. यामुळे आता गावं कोरोना मुक्त होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात जास्त कोरोना रुग्णसंख्या वाढळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

याबाबत जनतेशी लाईव संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला गाव कोरोनमुक्त करायचा आहे असे म्हटले होते. यामुळे याची घोषणा करण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन आपले गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

ग्रामीण भागात कोरोनामुक्त गाव, तालुका, जिल्हा, आणि अवघा महाराष्ट्र व्हावे, या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे, अशी माहिती ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामुळे लवकरच राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात लसीकरण देखील सुरू आहे. लसीचे फायदे देखील दिसून आले आहेत. असे असताना मात्र लसीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण थांबले आहे.

ताज्या बातम्या

कोरोनाची तिसरी लाट असणार भयानक, ‘एवढे’ बळी जाणार; एसबीआयने दिली धक्कादायक माहिती

कृष्णा अभिषेक आपल्या मामा गोविंदावर का नाराज आहे? वाचा दोघांमधील वादाचे मुख्य कारण

बजाजने बाजारात आणली नवीन बाईक, एक लिटर पेट्रोलमध्ये धावणार १०४ किमी, किंमत फक्त..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: