लसीकरणात देशात महाराष्ट्र सर्वात पुढे; तीन कोटींचा टप्पाही ओलांडला

June 26, 2021 0 Comments

मुंबई: करोना प्रतिबंधात्मक मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारे पहिले राज्य ठरले आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिले आहे. ( ) वाचा: लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत राज्यात एकूण ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. आज एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, केंद्र सरकारने देशात जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राने लसीकरणात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. लसतुटवडा असतानाही सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा करून लसीकरणात खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. लसीकरणात सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ ते ६० वगोगटातील व्याधीग्रस्त नागरिक यांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात आले. त्यात महाराष्ट्र राज्य सर्वात पुढे होते. आता केंद्र सरकारने लसीकरण धोरणात महत्त्वाचा बदल केला असून योगदिनापासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. यातही महाराष्ट्राने आघाडी घेतली असून गेल्या चार दिवसांत विक्रमी लसीकरण राज्यात झाले आहे. त्यात आज राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडल्याने आरोग्य यंत्रणेचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: