‘दे धक्का’ मधील शुक्राची चांदणी आहे सिनेसृष्टीपासून लांब; कारण जाणून आश्चर्य वाटेल
‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. त्यातील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना आवडतो. सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश मांजरेकर व अतुल काळे यांचा हा २००८ साली रिलीज झालेला चित्रपट प्रचंड गाजला होता.
या चित्रपटामध्ये सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांनी प्रमुख तसेच महत्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय या चित्रपटामध्ये दोन बालकलाकार यांचाही समावेश होता.
सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या बालकलाकारांनी महत्त्वाची भूमिका चित्रपटात साकारली होती. या बालकलाकारांच्या अभिनयाने तर रसिकांची मनेच जिंकली होती. त्यामुळेच ‘दे धक्का’ हा चित्रपट सुपरहि ट ठरला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता मात्र हे बालकलाकार खूप मोठे झाले आहेत.
आज आपण याच चित्रपटातील बालकलाकार गौरी वैद्य हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत. गौरी वैद्य हिने ‘दे धक्का’ चित्रपटात मकरंद अनासपुरेंची मुलगी म्हणजेच सायली हिची भूमिका साकारली होती. गौरीच्या ‘उगवली शुक्राची चांदणी’ या गाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.
‘दे धक्का’ मधील तिच्या या गाण्याने तिला एक नवीन ओळख करून दिली. हा चित्रपट १६ मे २००८ ला रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर गौरी ‘शिक्षणाच्या आईचो घो’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये तिने सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली.
तसेच तिने २०११ मध्ये देखील ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या रियालिटी शोमध्ये तिने सक्षम सोबत काम केले. याशिवाय गौरीने २०१५ साली ‘आवाहन’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २००७ साली आलेल्या तामिळ चित्रपटाचा रिमेक होता.
‘आवाहन’ चित्रपटानंतर गौरी मनोरंजनसृष्टी पासून खूपच दुरावली आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटानंतर गौरी खूपच मोठी झाली आहे आणि तिचा लुक ही खूपच बदलला आहे. गौरी खूप सुंदर व आकर्षक दिसते आहे. आपण तीला ओळखू ही शकणार नाही इतकी सुंदर दिसत आहे.
गौरीने आता आपल्या आपल्या शिक्षणावरती जास्त लक्ष केंद्रित केले आहे. गौरी आता मोठी म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षाची झाली आहे. तिने मुंबईमध्ये ‘डि. जी. रुपारेल महाविद्यालय’ यामधून शिक्षण घेतल्यानंतर तिने इंजीनियरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी मधून पदवी शिक्षण पूर्ण केले.
गौरीला पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करताना पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे पुढे गौरी कोणत्या चित्रपटात पाहायला मिळेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
हे ही वाचा-
VIDEO: धक्कादायक! अभिनेत्री लाईव्ह परर्फोमंस करत असताना अचानक ३० लांडग्यांनी केला हल्ला अन्
माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप
ऐकावे ते नवलच! तरुणी पडली बॉयफ्रेंडच्या आजोबांच्या प्रेमात; बाळाच्या जन्मानंतर झाला धक्कादायक खुलासा
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: