'बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले'

June 02, 2021 0 Comments

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ सध्या काढले जात आहेत. शिवसेनेनं हे सर्व तर्कवितर्क खोडून काढताना फडणवीस व भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 'फडणवीस हे पवारांना भेटले ते बरेच झाले. यात वाकडा अर्थ काढण्याची गरज नाही. बऱ्याच काळानंतर फडणवीस हे योग्य व्यक्तीला भेटले. त्या भेटीतून त्यांना नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल,' असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. (Shiv Sena on Sharad Pawar-Devendra Fadnavis Meeting) वाचा: पवार-फडणवीसांच्या भेटीनंतर राज्यात 'ऑपरेशन कमळ'ची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून यावर भाष्य करताना या भेटीचं स्वागतच केलं आहे. 'पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान मोदींपासून इतर अनेक पक्षांतील लोक त्यांच्याशी सल्लामसलत करीत असतात. फडणवीस आणि पवार यांच्यातील चर्चेबद्दलच्या ‘पुड्या’ आणखी दोनेक दिवस सुटतील. पण जे पवारांना ओळखतात ते नक्कीच सांगू शकतील की, पवारांनी विरोधी पक्षनेत्यांची शाळाच घेतली असेल. विरोधी पक्षानं संकटकाळात कसं जबाबदारीनं वागायला हवं याचं चोख मार्गदर्शन पवार यांनी फडणवीसांना केलं असावं,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ''सध्या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष बेभान झाला आहे व विरोधासाठी विरोध हेच त्यांचे ध्येय ठरले आहे. सध्याची स्थिती एकमेकांना सहकार्य करून राज्याला गती देण्याची आहे, पण विरोधी पक्षाने सरकारशी असहकार पुकारला आहे. राज्यातल्याच नव्हे, तर देशातल्या प्रत्येक बऱ्यावाईट गोष्टींचे खापर ते सरकारवर फोडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकारशी किंवा सत्ताधारी पक्षाशी भांडण असू शकते, पण महाराष्ट्राशी भांडण असू नये. सध्या विरोधी पक्षाचे भांडण महाराष्ट्राशी सुरू आहे ते राज्याच्या हिताचे नाही,' अशी टीका शिवसेनेनं केली आहे. वाचा: 'महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षाची व विरोधी पक्षनेत्यांची उत्तम परंपरा आहे. त्यातील एक विरोधी पक्षनेते शरद पवारसुद्धा होते. राज्य सरकारची कोंडी करून राज्याच्या हिताची कामे मार्गी लावणे हे विरोधी पक्षाचे मुख्य काम आहे. सरकार कोठे चुकत असेल तर आवाज चढवून बोलण्याचा अधिकारही विरोधी पक्षनेत्यांना आहेच. फडणवीस यांनी उत्तम विरोधी पक्षनेत्यांची परंपरा पुढे चालवली तर राजकारणातील त्यांचा नावलौकिक वाढेल,' असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: