कोरोना काळात मदतीसाठी धावून येणारा सोनू सूद आता स्वतः मागतोय मदत, जोडले हात, जाणून घ्या…
मुंबई । गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. यामुळे देशात अनेकांचे जीव गेले. अनेक कुटुंब उध्वस्त झाली. अनेकांचे मोठे हाल देखील झाले. या काळात देवदूत म्हणून अभिनेता सोनू सूदने अनेकांना मोठी मदत केली. त्याने स्वतः अनेक गरजवंताला मदतीचा हात दिला.
यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. तो अजूनही मदत करत आहे. आता अनेकांनी त्याला पंतप्रधान करण्याची मागणी देखील केली आहे. गेल्या वर्षीपासून न थकता तो लागोपाठ लोकांच्या मदतीसाठी धडपड करत आहे. कोरोना काळात लोकांसाठी काम करताना त्याला अनेकदा दुःखदायक प्रसंगाला देखील समोरे जावे लागत आहे.
याबाबतचे अनेक किस्से सोनूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लोकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या सोनूने आता एका अनाथ मुलीच्या मदतीसाठी लोकांसमोर हात जोडले आहेत. अभिनेता सोनू सूदने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर ही मदत मागितली आहे.
City: Nagpur
Day:1
Mother, Father, Brother & Sister all tested positive.
Day:7
Brother dies, Mom n Dad who are critical are not informed.
Day:9
Father dies without knowing the son passed away 2 days ago.
Day:10
Mother is very critical.
Only survivor is this 19 yr old girl— sonu sood (@SonuSood) June 5, 2021
सोनू सूदने या पोस्टमध्ये लिहिले, मी झोपेतून उठलो आणि मला ही बातमी कळली की त्या मुलीची आईचे सुद्धा निधन झाले. आता ही छोटीशी मुलगी अनाथ झाली. कृपा करून अशा सगळ्या कुटुंबाला सहकार्य करा. त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे.
तसेच जर तुम्ही मदत नाही करू शकत तर मला सांगा. मी करेल मदत. हे जीवन खूपच निर्दयी आहे. असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचे हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचे कौतुक देखील होत आहे.१९ वर्षीय मुलगी तिच्या संपूर्ण कुटुंबासह कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले.
त्याच्या दोन दिवसांनी लगेचच वडिलांचा मृत्यू झाला. आणि आईचाही मृत्यू झाला. यामुळे हो मुलगी अनाथ झाली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. हे कळल्यानंतर अभिनेता सोनू सूद दुःखी झाला आहे. त्यानंतर कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या अनाथ मुला-मुलींची मदत कऱण्याचा निर्णय सोनूने घेतला आहे. यामुळे तो आता मदतीचे आवाहन करत आहे. यामुळे त्याचे मदतीचे कार्य हे सुरूच आहे.
ताज्या बातम्या
ह.भ.प. गजानन बुवा यांचे आळंदीत लोकांना उपदेश आणि घरी पत्नीला मारहाण, विडिओ व्हायरल
विरुष्काच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा किती क्युट आहे वामीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला चित्रपट-टीव्ही मालिका निर्मात्यांशी संवाद, सांगितल्या या ‘अटी’
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: