करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पुण्यातील निर्बंधांबाबत झाला मोठा निर्णय

June 26, 2021 0 Comments

पुणे: जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन गृहमंत्री यांनी केले आहे. ( ) वाचा: पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सिल हॉल येथे दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील करोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी वळसे पाटील बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करून पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची करोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे वळसे पाटील म्हणाले. वाचा: प्रशासनाने म्युकरमायकोसिस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सध्या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल याविषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही वळसे पाटील यांनी दिल्या. वाचा: आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हयातील करोना प्रादुर्भाव व उपाययोजना तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने केलेली तयारी, लसीकरण याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार व महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हयातील करोना रुग्णस्थिती व लसीकरणाबाबत माहिती दिली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, आमदार अशोक पवार, चेतन तुपे यांनीही महत्त्वाचे विषय मांडले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भुजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे यावेळी उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: