महाविकास आघाडीत जुंपली! राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडणारच, संजय राऊतांचा इशारा

June 05, 2021 , 0 Comments

पुणे । महाविकास आघाडीत सध्या सर्वकाही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे. आता खेडमध्ये याची ठिणगी पडली आहे. खेडच्या आमदारांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. खेडमध्ये एका-मेकाची माणसे पळवली जात आहेत. अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या खेडमधील आमदारांना सत्तेची मस्ती आली आहे. या आमदारांना शरद पवारांच्या पक्षात राहायची लायकी नाही. अजित दादा आणि शरद पवार यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना समजवावे अन्यथा शिवसेनाने बांगड्या घातल्या नाहीत, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

येथील शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना नेहमी आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. विद्यमान आमदाराला अजित पवार यांनी समजूत द्यावी. असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

स्वर्गीय सुरेश गोरे यांनी आमदार असताना खेडमध्ये पंचायत समितीसाठी जागा ठरवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ती जागा बदलण्यासाठी जे घाणेरडे राजकारण केले ते निघृण राजकारण आहे. गोरे यांची भावनिक गुंतवणूक त्या कार्यात होती.

जर विद्यमान आमदारांना एवढी माणुसकी नसेल तर ते शरद पवारांच्या पक्षामध्ये राजकारण करण्यास लायक नाहीत. असेही राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पंचायत समितीच्या सदस्यांना पळवून नेले, अविश्वास ठराव मंजूर करताना जो तमाशा करण्यात आला. यामुळे हे प्रकरण त्यांच्या प्रमुख नेत्यांपर्यंत नेऊ असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते खेड दौऱ्यावर होते.

ताज्या बातम्या

5G प्रकरणी जुही चावलाला न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळत केला २० लाखांचा दंड

“प्रीवेडिंगवाल्यांना त्रास देऊ नका, ते हनिमूनसाठी पण इथेच आले पाहिजेत”

या गावात लस घेतल्यावर मिळत आहे बिर्याणी, फ्रिज, दुचाकी आणि बरंच काही, वाचा सविस्तर..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: