एका दिवसात सात लाखांवर नागरिक लसवंत!; महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी

June 27, 2021 0 Comments

मुंबई: मोहिमेत दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. ( ) वाचा: लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. शुक्रवारी राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. वाचा: दरम्यान, योग दिनापासून म्हणजेच २१ जूनपासून देशात लसीकरण धोरण बदलण्यात आले आहे. नव्या धोरणानुसार १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून मोफत लस देण्यात येत आहे. त्यानुसार देशातील सर्वच राज्यांत लसीकरणाचा वेग वाढला आहे. गेल्या सहा दिवसांत देशात तब्बल ३.७७ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या अनुषंगाने आजच पंतप्रधान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाचा वाढलेला वेग ही समाधानाची बाब असल्याचे नमूद करत याच पद्धतीने युद्धपातळीवर लसीकरण मोहीम पुढे न्यावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: